विरोधकांनी काड्या केल्यामुळे ५ टीएमसी पाणी रद्द : दत्तात्रेय भरणे

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाण्याची तरतुद केली होती.
Dattatrey Bharne
Dattatrey BharneSakal
Updated on

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाण्याची तरतुद केली होती. तालुक्यातील विरोधकांनी ( माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी) काड्या घालून सोलापूरकरांना भडकवले. याची मोठी किंमत तालुक्याला मोजावी लागली. येणाऱ्या काळामध्ये किती काड्या घातल्या तरीही इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. येणाऱ्या तीन वर्षामध्ये तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला तरच २०२४ च्या निवडणूकीला तुमच्या समोर येईल असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेचे झोड उडवली.

तावशी (ता.इंदापूर) येथे १२ कोटी ५० लाख रुपयांच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक अॅड. रणजित निंबाळकर, रसिक सरक, बाळासाहेब पाटील, दत्तात्रेय देवकाते, डॉ.कमलाकर व्होरकाटे,बाळासाे देवकाते, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर,पार्थ निंबाळकर, विक्रांत सरक, राहुल व्होरकाटे, राजेंद्र थोरात, देविदास व्होरकाटे उपस्थित होते.यावेळी भरणे यांनी सांगितले की,इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी मंजूर केले होते. मुख्यमंत्र्यांनी सही ही केली.

Dattatrey Bharne
पुणे : शेवाळेवाडी फाट्यावरील चेंबर दुरुस्तीला मुहूर्त कधी?

मात्र विरोधकांना तालुक्यातील शेतकऱ्यांचे काही देणे-घेणे नाही. त्यांना राजकारण करायचे असून शेतकऱ्यांना पाणी मिळाले तर आपलं कसे होईल ? अशी भिती वाटल्याने त्यांनी काड्या घालतल्या. माझ्याबदद्दल गैरसमज पसरवला. माझी सोलापूर जिल्हात जिवंतपणे प्रेतयात्रा काढली. माझ्या पुतळ्याला उजनीमध्ये बुडविले. तालुक्यातील विरोधकांमुळे शेतकऱ्यांनी सर्वांत मोठी किंमत मोजली. विरोधकांनी किती काड्या घालू द्या. येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.येणाऱ्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तालुक्याचा चेहरा-मोहरा बदला तरच २०२४ च्या निवडणूकीला तुमच्या समोर येईल. अन्यथा येणार नसल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश धापटे यांनी केले.

थोर व्यक्तींचे आदर्श डोळ्यासमोर घेवून काम करायचे - भरणे

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, तालुक्यातील थोर व्यक्तिींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून तालुक्यामध्ये काम करीत आहेत. स्वर्गीय शंकरराव ( भाऊ) यांच्याकडून काम करताना कुणावरही अन्याय होवू नये असे काम करण्यास शिकलो. कार्यकर्त्यांना कसे सांभाळयाचे कसे घडवायेच याची शिकवण स्वर्गीय गणपतराव पाटील यांच्याकडून घेतली. एखादा कार्यकर्ता नाही म्हणत असताना त्याला होय कसे करायचे हे स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप साहेबांकडून शिकलो असल्याचे सांगून भरणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टाईल भाषण करुन तालुक्यातील जनतेची मने जिंकत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()