इंदापूरच्या शेतकऱ्याने घेतले विक्रमी उत्पादन; एक एकरात १५ टन डाळिंबे

इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडी येथील शेतकऱ्याने एक एकरामध्ये १५ टन डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले.
Rajendra Pawar
Rajendra PawarSakal
Updated on
Summary

इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडी येथील शेतकऱ्याने एक एकरामध्ये १५ टन डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडी येथील शेतकऱ्याने एक एकरामध्ये १५ टन डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले. डाळिंबाला चांगला दर मिळाल्यामुळे एकरामध्ये १५ लाख रुपये मिळाले असून, डाळिंब दुबईला निर्यात केले.

लहरी हवामान व बाजारभावाच्या चढउतारामुळे शेती हा आट्याबट्याचा व्यवसाय झाला आहे. शेतकऱ्याला निसर्ग व बाजारभावाची साथ मिळाली, तर शेतकरी लखपती होण्यास वेळ लागत नाही. शिरसटवाडी येथील राजेंद्र दशरथ पवार व आजिनाथ दशरथ पवार यांना पावणेसात एकर शेती आहे. यामध्ये साडेपाच एकरामध्ये डाळिंबाची दोन टप्प्यामध्ये लागवड केली. उर्वरित शेतामध्ये शेळ्यासाठी चारा म्हणून मका व इतर पिके घेतली जातात. पवार कुटुंबाकडे ५० ते ६० शेळ्या आहेत. पवार यांनी सन २०१५ मध्ये लागवड केलेल्या डाळिंबाच्या शेतीमधील एक एकरातील डाळिंबाचा बहार जानेवारीमध्ये महिन्यामध्ये धरला होता. गेल्या चार दिवसांपासून डाळिंबाची तोडणीस सुरवात झाली असून, आत्तापर्यंत एक एकरामध्ये १५ टन विक्रमी उत्पादन निघाले आहे. डाळिंबाच्या झाडावरती अजूनही काही फळे असून, याची तोडणी एक महिन्यानंतर होणार आहे.

सध्या डाळिंबाला चांगला दर मिळत असून, १०० रुपये प्रतिकिलो दराने डाळिंबाची विक्री बांधावरच केली. १५ टनाचे १५ लाख रुपये झाले असून उर्वरित डाळिंबाचेही चांगले पैसे होतील, अशी अपेक्षा आहे. राजेंद्र व आजिनाथ पवार यांना घरातील दैवशाला व राणूबाई पवार यांनी साथ दिली. त्यामुळे एकरामध्ये १५ टनाचे उत्पादन काढणे शक्य झाले.

स्लरीचा असा झाला फायदा

पवार कुटुंबाने शेण, गोमूत्र, गूळ, हळद यांच्यापासून स्लरीचे मिश्रण तयार करून ठेवले आहे. डाळिंबाच्या झाडावरती कळीचे सेटिंग झाल्यानंतर प्रत्येक झाडाला एक लिटरप्रमाणे स्लरीचे द्रावण ओतले होते. त्याचा फायदा झाला असून, झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढली. तेल्या, कुजवा रोगाचा प्रार्दुभाव झाला नाही. तसेच, फळांच्या संख्येबरोबर डाळिंबाचे वजनही वाढले. डाळिंबाच्या फळांना चकाकी (ग्लेझिंग) आल्यामुळे १०० रुपये प्रतिकिलो विक्रमी दर मिळाला. त्यामुळे १ एकरामध्ये १५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.