इंदापूर : शहरातील मानाच्या पहिल्या तिन्ही गणपतींची विधिवत पूजा करून पारंपरिक वाद्यासह आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीसह रथातून विसर्जन मिरवणूकीला दुपारी उत्साहात सुरुवात करण्यात आली..मानाच्या पहिल्या श्री सिद्धेश्वर मंडळाच्या गणरायाची मंगळवार दुपारी 12 वाजता इंदापूर शहराच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा व शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तहसीलदार जीवन बनसोडे, मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली.यावेळी विठ्ठल ननवरे, प्रा. कृष्णा ताटे, वसंतराव मालुंजकर, मच्छिंद्र शेटे-पाटील, अविनाश कोतमिरे, धनंजय बाब्रस, अनिकेत वाघ, अशोक मखरे, विनायक बाब्रस,यांचेसह गजानन निलाखे, नागेश भंडारी, महेश भिंगे,.श्रीकांत गुरव, गिरीश गुरव, हमीद आ, महादेव चव्हाण उपस्थित होते. दरम्यान, डॉ. कदम गुरूकुलच्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशा पथक लक्षवेधक ठरले. यावेळी श्रींच्या पालखीला प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय पुढारी यांनी खांद्यावर घेत विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केली. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक हलगीच्या निनादात मिरवणुकीला प्रारंभ झाला.त्यानंतर मानाचा दुसरा गणपती श्री नरसिंह प्रसादिक मंडळाच्या गणरायाची आरतीही मान्यवरांच्या हस्ते झाली. विसर्जन मिरवणुकीसाठी पर्यावरण पूरक गणपती सजावटी अंतर्गत फुलांनी सजवलेल्या उगवत्या सूर्याच्या रथांमधून गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली..Pune Ganpati Visarjan: पुण्यात अवजड वाहनांना कधीपर्यंत प्रवेश बंदी? दुचाकी आणि चारचाकीसाठी कुठे असेल पार्किंग? जाणून घ्या.तर मानाचा तिसरा गणपती नेहरू चौक सामाजिक मित्र मंडळाचीही ढोल ताशांच्या गजरात आकर्षक सजावट केलेल्या रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली. मानाचा चौथा गणपती शहीद भगतसिंग मित्र मंडळानेही आकर्षक सजावट केलेल्या रथामध्ये गणपतीची मिरवणूक काढीत भक्तिमय वातावरणात गणरायाला विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.दरम्यान इंदापूर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये ही घरगुती तसेच छोट्या सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिसाद देत त्या ठिकाणी गणेश मूर्तीचा विसर्जन केले जात आहे.यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने बसवण्यात आलेल्या गणरायाच्या मूर्तीचेही ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले यावेळी पोलीस बंधू भगिनी यांनी केलेल्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.