Indapur Assembly
Indapur AssemblyEsakal

Indapur Assembly: इंदापूर विधानसभा मतदारसंघ कुणाची हवा? हर्षवर्धन पाटील दत्ता भरणेंची हॅट्ट्रिक सोखणार का?

NCP: राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोणत्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राहणार, हे सिद्ध करणारी निवडणूक.
Published on

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून, त्यांच्या प्रवेशामुळे पक्षातील निष्ठावंत मात्र नाराज झाले आहेत. आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोणत्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राहणार, हे सिद्ध करणारी निवडणूक.

Indapur Assembly
Sharad Pawar NCP: शरद पवारांनी मंत्रिपदाचा शब्द दिलेल्या आमदाराविरोधात कोण लढणार? जाणून घ्या शिरूर मतदारसंघाची परिस्थिती

अशी आहे स्थिती

  • हर्षवर्धन पाटलांसाठी कन्या अंकिता व पुत्र राजवर्धन मैदानात

  • आमदार भरणे यांचा पुढाऱ्यांपेक्षा सर्वसामान्य मतदारांबरोबर संवाद साधण्यावर भर

  • इंदापूर शहरातील मालोजीराजे गढी, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणारा शिरसोडी ते कुगाव पूल, लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना, जंक्शन येथे एमआयडीसी मंजुरी, निरा नरसिंहपूर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून झालेला कायापालट, शहरासह तालुक्याच्या विविध ग्रामीण भागांत उभारण्यात आलेल्या भव्य प्रशासकीय इमारती या आमदार भरणे यांच्या जमेच्या बाजू.

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात केलेला प्रवेश, शिक्षण संस्था व कारखान्याचे जाळे, तालुक्यामधील हक्काचे कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वर्चस्व ठेवण्याचा असलेला हातखंडा, २० वर्षे मंत्रिपद या हर्षवर्धन पाटील यांच्या जमेच्या बाजू.

निवडणूक मुद्दे

१. आमदार भरणे यांच्याकडून तालुक्याच्या विकासासाठी आणलेल्या ६००० कोटी रुपयांचा विषय, तसेच कर्मयोगी व निरा-भीमा कारखान्याबाबत कर्मचारी व शेतकऱ्यांची नाराजी, वारंवार बदललेले पक्ष हे प्रमुख मुद्दे प्रचारात
२. विकासकामांत झालेल्या भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जा यावर हर्षवर्धन पाटील यांचा भर

#ElectionWithSakal

Indapur Assembly
Junnar Constituency: जुन्नर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांचा ओढा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()