Independence Day 2020: देशाटनातून मातीशी नातं घट्ट करणारा कर्नल!

Colonel_C_Haricharan
Colonel_C_Haricharan
Updated on

स्वातंत्र्यदिन २०२० : पुणे : 'ऍडव्हेंचर' म्हणून देशभ्रमंती करणारे दुचाकीस्वार आपण बघितले असतील. पण, देश रक्षणाच्या कर्तव्याबरोबरच मातीशी असलेले नातं अधिक घट्ट करण्यासाठी देशाटन करणारे सैनिक हे दुर्मिळच. सध्या पुण्यात स्थाईक असलेले ५० वर्षीय कर्नल सी. हरिचरण यांनी दुचाकीवर देशभरात भ्रमंती करत एक आगळंवेगळं उदाहरण समोर ठेवले आहे. 

आपला आजवरचा प्रवास उलगडताना कर्नल म्हणाले, "शाळेत असल्यापासून मला दुचाकी चालवण्याची आवड होती आणि बाबांच्या स्कूटरमुळे गाडी चालवायला शिकलो. कॉलेजमध्ये असताना बाबांनी बाईक घेऊन दिली. मग हट्ट सुरू झाला तो लांबचा पल्ला गाठण्याचा. तेव्हा मित्रासोबत पहिला प्रवास ठरला, तो ही दोन हजार ५०० किलोमीटरचा. त्यानंतर देशाचा कानाकोपरा आपल्या दुचाकीवरून फिरण्याची इच्छा आणखीन तीव्र झाली.

लष्करात अधिकारी म्हणून भरती झालो आणि जिथे बदली होत गेली, त्या भागात पोहोचताच दुसऱ्या दिवसापासून त्या संपूर्ण परिसराशी ओळख करण्यासाठी बाईकवर बाहेर पडायचो. लांब पल्ल्याच्या प्रवासाने त्या भागातील लोकांशी विशेष नाते ही तयार झाले. लष्करात असल्याने सहसा कुटुंबीयासाठी तितका वेळ देता येत नव्हता, त्यात लांबलांबचा प्रवास करण्याचा छंद. परंतु माझ्या या छंदामुळे माझी पत्नी देखील कित्येक वेळा माझ्यासोबत अशा प्रवासात असते. बऱ्याच वेळी १५ ऑगस्टचे निमित्त साधून बाईक रायडिंगच्या कार्यक्रमात सहभाग घेतला, परंतु यंदा मात्र कोरोनामुळे हे शक्‍य झाले नाही.'' 

सध्या मी शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्थेत (एआरडीई) कार्यरत असून माझा मुलगा जर्मनीमध्ये आहे. माझा हा छंद फक्त माझाच नसून आता माझ्या मुलाचाही झाला आहे. सध्या तरुणांमध्ये डिप्रेशन आणि ताणतणाव वाढत आहे. अशावेळी त्यांनी जे आवडतं किंवा कोणताही छंद असो, त्यासाठी वेळ काढून आनंदाचे क्षण जगायला हवे, असा खास संदेश हरिचरण यांनी युवकांना दिला आहे. 

अशी केली रायडर क्‍लबची सुरुवात 
देशातील वेगवेगळ्या भागातून लोक लडाखमध्ये खास दुचाकीचा प्रवास करतात. नेपाळ, ईशान्य भारत, लडाख, गोवा, हैदराबाद अशा वेगवेगळ्या भागांचा प्रवास करताना कित्येक माझ्यासारख्या बाईक प्रेमींशी माझी मैत्री झाली. त्यावेळी आम्ही सगळे 'रॉयल एनफिल्ड' या ग्रुपचे सदस्य होतो. लष्करात असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी बदली आणि त्या संपूर्ण परिसराची माहिती असल्याने मी या मित्रांसोबत 'रायडर क्‍लब' तयार केला. त्यामध्ये पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या शहरातून सगळे सहभागी झाले आणि आम्ही १९ दिवसांचा लडाख दौरा केला होता, अशी आठवणही हरिचरण यांनी यावेळी सांगितली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.