Independence Day 2023 : टिळकांच्या अगोदर 'केसरी वाडा' कुणाकडे होता ?

तुम्हाला पुढच्या पिढीला आपला वारसा सांगायचाय?
Independence Day 2023
Independence Day 2023Sakal
Updated on

Independence Day 2023 - भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा देण्याचे कार्य पुण्याने केले आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचे वास्तव्य असलेला केसरी वाडा, महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांना नजरकैदेत ठेवले तो ‘आगाखान पॅलेस’,

‘पुणे करार’ झालेले येरवडा कारागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विदेशी कपड्यांची होळी केली ते ठिकाण, नारायण दाभाडे ज्या ठिकाणी हुतात्मा झाले ते काँग्रेस भवन... तुम्हाला पुढच्या पिढीला आपला वारसा सांगायचाय?

Independence Day 2023
Pune Crime : पबमध्ये राष्ट्रध्वज भिरकावला; राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल

या किंवा अशा स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित वास्तूंना आज, या आठवड्यात आवर्जून भेट द्या. तेथील इतिहास समजून घ्या आणि हो, ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आम्हाला कळवायला विसरू नका...

Independence Day 2023
Mumbai News : प्रवाशांची तक्रार ऐकण्यासाठी RPF जवान गेला पण तोल गेला अन् जीव गमावला

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचे वास्तव्य असलेली वास्तू म्हणजे केसरी वाडा. ही वास्तू गायकवाड वाडा म्हणून ओळखली जात होती. टिळकांनी १९०५ मध्ये बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून तो विकत घेतला.

तेथे ‘केसरी’ वर्तमानपत्राचे कार्यालय सुरू केले. याच वाड्यात स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक बैठका झाल्या. येथेच त्याची दिशा निश्चित करण्याबाबत विचारमंथन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.