दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील स्वातंत्र्यसैनिक नारायणराव गणपती फडतरे हे स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेत सहभागी झाले होते. ब्रिटिशांशी लढा देताना त्यांनी अनेक दिवस कंदमुळे खाऊन दिवस काढले होते. रंगूनच्या तुरुंगात त्यांनी अनेक महिने काढले. कुटुंबापासून ते सहा वर्षे बेपत्ता होते. त्यामुळे घरच्यांनी त्यांची आशाच सोडली होती. मात्र, हालअपेष्टा सहन करत, अडथळे पार करत ते परत घरी परतले. त्यानंतरही पोलिस दलात भरती होऊन सेवा केली.