केडगाव - दिवगंत स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार जगन्नाथ पाटसकर यांच्या घराचा प्रश्न ३२ वर्षानंतरही कायम आहे. सार्वजनिक वापरासाठी दौंड शहरातील स्वतःची साडेसात एकर जागा त्यांनी सन १९९२ मध्ये सरकारला दिली. स्वातंत्र्यानंतरही घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या पाटसकर यांची तिसरी पिढी आजही भाड्याच्या घरात राहत आहे.