वेल्हे,(पुणे) : पुणे ग्रामीण पोस्ट विभाग अंतर्गत येणाऱ्या (पुणे शहर , पुरंदर, शिरूर, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुका वगळून) पोस्ट ऑफिस संदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी गुरुवार(ता.२८)
डिसेंबर रोजी दुपारी ०३.०० वाजता “पोस्टल डाक अदालत” चे आयोजन शिवाजीनगर येथील अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग कार्यालयामध्ये करण्यात आले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली आहे.
देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे .देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे.
पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषणामध्ये अथवा पत्रव्यवहारांमध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटींमुळे असे प्रसंग निर्माण होतात
की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते या तक्रारींना योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याची ठरविले आहे .त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतात.
ज्या तक्रारींचे सहा आठवड्यामध्ये (स्पीड पोस्ट सोडून) दखल घेतली गेलेली नसेल अशा प्रकारच्या तक्रारीचा यात समावेश होऊ शकणार आहे. एका तक्रार धारकाकडून एकच तक्रार लेखी स्वरूपात येणे आवश्यक आहे.
विशेषतः टपाल वस्तू/ मनी ऑर्डर/ बचत बँक खाते/ प्रमाणपत्र इत्यादि बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलांसह केलेला असावा, उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी.
ज्या तक्रारीची दखल पूर्वीच्या डाक अदालत द्वारे घेण्यात आलेली आहे, अशा तक्रारीचा परत डाक अदालत मध्ये समावेश करता येणार नाही. आपले तक्रार अर्ज “डाक अदालत तक्रार” या शीर्षकाने दिनांक २२.१२.२०२३ किंवा तत्पूर्वी
अधिक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग यांचे कार्यालय, शिवाजीनगर, पुणे ४११००५ या पत्त्यावर किंवा dopunemuffasil.mh@indiapost.gov.in) या ईमेल वर पाठवावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार डाक अदालत मध्ये केला जाणार नसल्याची माहिती एरंडे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.