पुणे - भारत आणि श्रीलंकेच्या सैन्यदलात होणाऱ्या ‘मित्र शक्ती’ या लष्करी सरावाला गुरुवारपासून (ता. १६) पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन येथे सुरुवात झाली. हा लष्करी सराव २९ नोव्हेंबरपर्यंत होणार असून संयुक्त राष्ट्र सनद अध्याय सात अंतर्गत उप-पारंपरिक मोहिमेचा संयुक्तपणे सराव करणे हा मुख्य उद्देश आहे.
या सरावामध्ये भारतीय सैन्यदलाच्या पथकाचे प्रतिनिधित्व मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटच्या तुकड्या करत आहेत. तर श्रीलंकेचे प्रतिनिधित्व ५३ पायदळ तुकडीचे जवान करत आहेत. त्याचबरोबर या सरावामध्ये दोन्ही देशांच्या हवाईदलातील एकूण २० जवानांचा सहभाग आहे.
या सरावाच्या माध्यमातून दहशतवादविरोधी कारवायांमध्ये एकत्रितपणे समन्वय साधणे, शत्रूच्या कारवाया हाणून पाडणे, शोधमोहीम, विविध मोहिमांसाठी रणनीतिक कृती करणे आदींचा यात समावेश असेल. तसेच दोन्ही देश युद्ध कौशल्यांच्या विस्तृत कार्यक्षेत्रात संयुक्त दृष्टिकोनाची आणि सरावाची देवाणघेवाण करतील. महत्त्वाचे म्हणजेच या सरावामध्ये हेलिकॉप्टरबरोबर ड्रोन आणि मानवरहित हवाई यंत्रणांचाही समावेश करण्यात आला आहे.
‘मित्र शक्ती’च्या माध्यमातून शांतता मोहीमांदरम्यान संयुक्त राष्ट्रांचे हित अग्रस्थानी ठेवून सैन्यांमधील परस्पर कार्यक्षमतेची पातळी वाढवण्यासाठी आणि जीवितहानी व मालमत्ता हानीचा धोका कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर दिला जाणार आहे.
सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण केल्याने भारतीय लष्कर आणि श्रीलंकेचे लष्कर यांच्यातील संरक्षण सहकार्याची पातळी आणखी वाढेल. या सरावामुळे दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.