Indian Railway : झुक झुक आगीनगाडी ते ‘वंदे भारत’ भारी, प्रवासी रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण

Indian Railway : प्रवासी रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण, भारतीय रेल्वेचा रोमांचकारी प्रवास
Indian Railway
Indian Railwayesakal
Updated on

प्रसाद कानडे

Indian Railway : वाफेच्या इंजिनपासून सुरू झालेला भारतीय रेल्वेचा प्रवास आता बुलेट ट्रेनच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे. १६ एप्रिल १८५३ साली देशात पहिली प्रवासी रेल्वे धावली. ते आजतागायत (कोरोनाचा काळ व १९७४ साली झालेला संप वगळता) अव्याहतपणे धावत आहे.

या १७१ वर्षांत भारतीय रेल्वेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. ब्रिटिशकाळात व्यापारासाठी व सैन्याच्या वाहतुकीसाठी भारतात रेल्वे सुरू झाली, पण आता मात्र देशांतर्गत वाहतुकीचे सर्वांत मोठे व प्रभावी माध्यम ठरले आहे. रेल्वेच्या या रोमांचकारी प्रवासाचा हा आढावा

भारतीय रेल्वेची रंजक सफर

  • भारतात पहिली रेल्वे चेन्नई येथे १८३६ साली धावली. मात्र ही प्रवासी रेल्वेगाडी नव्हती. ‘रेडा हिल’ असे याचे नाव होते. त्यातून मालाची वाहतूक होत.

  • १८५२ साली रेल्वेमार्ग बांधून झाल्यावर याच वर्षी इंग्लंडहुन वाफेवर धावणारे इंजिन मुंबईत दाखल झाले.

  • ‘लॉर्ड फॉकलंड’ हे त्या इंजिनाचे नाव ठेवण्यात आले.

  • १६ एप्रिल १८५३ साली देशात पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे (३४ किलोमीटर) दरम्यान धावली.

  • ‘सिंध’, ‘सुलतान’ व ‘साहेब’ या नावाची तीन इंजिने जोडण्यात आली.

  • बोरीबंदर ते ठाणे हे अंतर कापण्यासाठी ५७ मिनिटे लागली.

  • अशा रीतीने भारतात प्रवासी रेल्वेच्या युगास प्रारंभ झाला.

रेल्वेचा प्रवास हा सुसाट

  • १९५५ मध्ये लाकडी डब्यांचे रूपांतर लोखंडी डब्यांत करण्याचे ठरले.

  • त्यानुसार स्विझर्लंड येथून डब्याचे शेल (प्रोटोटाइप )आणण्यात आले.

  • १९६२ मध्ये चेन्नईजवळच्या ‘आयसीएफ’ रेल्वे कोच फॅक्टरीत त्या प्रोटोटाइपनुसार डब्याचे उत्पादन झाले. त्यालाच ‘आयसीएफ’ डबे म्हणून ओळखले जातात

  • याचवेळी पॅसेंजर दर्जाच्या गाड्यांना एक्स्प्रेस दर्जा दिला.

  • १ मार्च १९६९ मध्ये देशात पहिली ‘राजधानी एक्स्प्रेस’ दिल्ली ते हावडा दरम्यान धावली. ही भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन ठरली.

  • ‘राजधानी’मुळे भारतीय रेल्वे फास्टट्रॅकवर आली.

  • १९८६मध्ये भारतीय रेल्वेत संगणकीकृत आरक्षण तिकीट प्रणालीला सुरुवात. दिल्ली येथे पहिले तिकीट देण्यात आले.

  • १९८८ मध्ये देशात ‘शताब्दी एक्स्प्रेस’ सुरू झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १००व्या जयंती निमित्ताने ही सेवा सुरू झाली.

  • नवी दिल्ली ते ग्वालियरदरम्यान पहिली शताब्दी एक्स्प्रेस धावली.

  • २००६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या संकलपनेवरून ‘गरीब रथ’ची सेवा सुरू झाली.

  • २००९-१० मध्ये ‘दुरांतो एक्स्प्रेस’ सुरू झाली. नवी दिल्ली ते सेलदाह दरम्यान ही सेवा सुरू झाली.

  • १८ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय रेल्वे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या निमित्ताने एका वेगळ्या टप्प्यावर पोहचली. या दिवशी वाराणसी ते नवी दिल्लीदरम्यान देशातील पहिली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावली.

घोडे जोडून धावत होती ट्राम

  • ९ मे १८७४ मध्ये कुलाबा ते पायधुनी दरम्यान पहिली ट्राम धावली. यासाठी दोन घोड्यांचा वापर झाला.

  • ७ मे १९०७ मध्ये विजेवर धावणारी ट्रामची सेवा सुरू झाली.

  • सप्टेंबर १९२०मध्ये डबलडेकर ट्रामची सेवा सुरू झाली.

  • १९५२च्या काळात मुंबईत बेस्टलादेखील चांगला प्रतिसाद मिळू लागला.

  • १९५३पासून ट्रामची सेवा कमी करण्याचा निर्णय घेतला.

  • ३१ मार्च १९६४ साली मुंबईत शेवटची ट्राम धावली.

इतिहासाच्या पाऊलखुणा

  • आतासारखे तेव्हादेखील पुरुष प्रवासी महिलांच्या डब्यात घुसत, तेव्हा रेल्वे अशा प्रवाशांना २० रुपयांचा दंड करीत.

  • १८५४ साली रेल्वेत ‘मासिक पास’ला सुरुवात झाली.

  • रेल्वे प्रवासासाठी २४ नियम तयार करण्यात आले.

  • रेल्वेचा डबा हा लाकडी होता.

भारतीय रेल्वेची पूर्वपीठिका

  • १८४० च्या दशकाच्या अखेरीस इंग्लंड मध्ये भारतात एक प्रायोगिक रेल्वे सुरू करण्याचे ठरले.

  • १४ नोव्हेंबर १८४९ रोजी इंग्लंडमधील अभियंत्यांनी भारतात रेल्वे सुरू करण्याची जवाबदारी जेम्स जॉन बर्कले यांच्यावर सोपवली.

  • १७ ऑगस्ट १८४९ साली जीआयपी रेल्वे (ग्रेट इंडियन पेनीन्सुला रेल्वे) व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात बोरीबंदर - ठाणे दरम्यान रेल्वेमार्ग बांधण्याचा करार झाला.

  • ७ फेब्रुवारी १८५० रोजी एका जहाजातून बर्कले यांचे मुंबईत आगमन.

  • रेल्वे सुरू करण्यापूर्वी रेल्वेमार्ग तयार करणे गरजेचे असल्याने मुंबईजवळच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास सुरू केला.

  • १८५० मध्ये बोरीबंदर ते ठाणे हा ३४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग सुरू करण्याचा निर्णय झाला.

  • मुंबई व जवळच्या परिसरातील मजुरांना हाताशी धरून रेल्वेमार्ग टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली.

  • १८५२ अखेर ३४ किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला.

  • यालाच ग्रेट इंडियन पेनीन्सुला रेल्वे म्हणून ओळखले जाऊ लागले. ही देशातील पहिली खासगी रेल्वे कंपनी ठरली.

तीन दर्जाची तिकीटे

  • प्रथम श्रेणीचा डबा : पांढऱ्या रंगाचा

  • द्वितीय श्रेणीचा डबा : खाकी रंगाचा

  • तृतीय श्रेणीचा डबा : गडद लाल रंगाचा

Indian Railway
Indian Railway: रेल्वेचा स्लीपर डबा की प्रवाशांचा कोंडवाडा? उकाड्यासह गर्दीमुळे वाढला त्रास, महिलांसह मुलांची गैरसोय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()