Wagholi News : वाहतूक कोंडीला वाघोलीकरांचा बेशिस्तपणा कारणीभूत; वाहतूक पोलिसांची गांधी गिरी

महिनाभरात ११३० वाहनावर कारवाई, सात लाख दंड वसूल.
Traffic Police
Traffic Policesakal
Updated on

वाघोली - महिनाभरात लोणीकंद वाहतूक विभागाच्या हजारो कारवाया, लाखोंचा दंड वसूल, वाहतूक नियमन बाबत जनजागृती, गांधी गिरी. मात्र तरीही वाघोलीकर वाहतूक नियमांची ऐशी तैशीच करीत आहेत. उलटी वाहतूक करणे, ट्रीपल शीट वाहतूक, कुठेही पार्किंग करणे सुरूच आहे. आपल्या बेशिस्त वाहतुकीमुळे  वाघोलीत वाहतूक कोंडी होते. याची जाणीव आहे तरीही हे सुज्ञ व शिक्षित वाहनचालक नियम तोडतच आहे.

पुणे नगर रोड व वाघोली म्हणजे वाहतूक कोंडी हे समीकरण झाले आहे. पुणेकर तर आहेतच मात्र मराठवाडा, विदर्भ व त्या बाजूने येणारे नागरिक वाघोलीच्या वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. वाघोली आली की त्यांना धास्ती बसते. वाघोली साठी स्वतंत्र लोणी कंद वाहतूक विभाग सुरू करण्यात आला. पुणे नगर रोड वरून जाणाऱ्या दररोजच्या वाहनांची संख्या सुमारे दीड लाख आहे.

वाहनांची संख्या व कमी पडत असलेला महामार्ग ही स्थिती आली तरी वाहतूक नियम पाळून कोंडी कमी करणे शक्य आहे. मात्र सोशल मीडियावर सतत तक्रार करणारे, वाहतूक पोलिसांना ट्रोल करणारे हेच नागरिक, वाहतूक कोंडीवर चर्चा घडविणारे हेच नागरिक उलटी वाहतूक करताना प्रचंड संख्येने दिसून येतात. चौकात जावून वळण्याचे कष्ट ते घेत नाहीत. विशेष बाब म्हणजे हेच वाघोलीकर जेव्हा चंदननगर व पुढे जातात तेव्हा वाहतुकीचे नियम बरोबर पाळतात.

वाघोलीतील कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल, बायपास रस्ते यांची गरज असली तरी सध्याच्या परिस्थितीत कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक नियम पाळणे तेवढेच गरजेचे आहे. महिनाभरात आम्ही लाखोंचा दंड भरू मात्र नियमांची ऐशी तैशी करू अशीच मानसिकता या सुज्ञ व शिक्षित वाहनचालकांची दिसून येते.

केवळ वाहतूक पोलिसांना दोष देवून कोंडी सुटणार नाही तर वाहतूक नियमांचे पालन करून व पोलिसांना साथ देवून कोंडी कमी करणे शक्य होणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियम पाळावे यासाठी लोणीकंद वाहतूक विभाग वाहतूक नियमन जनजागृती, नियम मोडणाऱ्या  ना फुल देवून गांधीगिरी करीत आहे.

या ठिकाणी प्रचंड उलटी वाहतूक

*  बायफ रोड चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकाकडे

*  लाईफ लाईन हॉस्पिटल पासून आय व्ही इस्टेट पर्यंत

*  सिल्व्हर क्रेस्ट सोसायटी कडून स्टार बाजार पर्यंत

* आहाळवाडी चौकात उलटी वाहतुक

वाहतूक कोंडीची अन्य करणे

* पुणे नगर महामार्गालगत वाहने पार्किंग

* चौकात सिग्नल्स कडे दुर्लक्ष करून बेशिस्त वाहतूक

* खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची प्रचंड संख्या

* शेकडो स्कूल बसेस

* पदपथ असून नसल्यासारखे. वाहतुकीस अडथळा ठरणारे

* व्यावसायिकांचे पदपथ व महामार्गालगत अतिक्रमणे

महिनाभरातील कारवाई

* ट्रीपल शिट वाहतूक --- ३३०

* उलट्या दिशेने वाहतूक -- १००

* महामार्गालागत पार्क वाहने -- ९००

* एकूण दंड वसूल --- सात लाख रुपये

नागरिक वाहतूक नियम पाळत नाही. बेशिस्त वाहतूक करतात. एवढी कारवाई व दंड वसूल करुनही वाहनचालकांचा बेशिस्तपणा सुरूच आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. Y या पुढेही बेशिस्त वाहतुकीवर अशीच कारवाई सुरू राहील.

- गजानन जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, लोणीकंद वाहतूक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.