बाजार समितीचे उत्पन्न ५१.४६ कोटी; प्रशासक मधुकांत गरड

१४ कोटींनी विक्रमी वाढ; प्रशासक मधुकांत गरड यांची माहिती
Market Commitee
Market CommiteeSakal
Updated on

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात बाजार शुल्काच्या (सेस) माध्यमातून सुमारे ५१.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १४ कोटी रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन २०२१-२२ या वर्षात विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी फळ,कांदा बटाटा विभागातून १४ कोटी १० लाख रुपये, विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर यांनी तरकारी विभागात नऊ कोटी ६६ लाख रुपये, तसेच विभाग प्रमुख नितिन रासकर यांनी २३ कोटी ७६ लाख रुपयांचे उत्पन्न बाजार शुल्काच्या (सेस) माध्यमातून मिळाले आहे. या तीन विभागात पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा २१ टक्क्यांनी तर गुळ भुसाराच्या उत्पन्नात २० टक्कयांनी वाढ झाली आहे. गुळ भुसार विभागाने बाजार शुल्कापोटी १९ कोटी ६९ लाख तसेच देखभाल शुल्कातून दोन कोटी ५८ लाख असे २१ कोटी ५९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. भाजीपाला बाजारातील २३.७६ कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नात यंदा पार्किंग शुल्कातून सुमारे सव्वाकोटी रुपये मिळाल्याने त्याचा समावेश आहे.

समितीने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात बाजार शुल्क वसूल केले आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील विविध विभागासह उपबाजारांतून मिळणाºया उत्पन्नात भर पडली आहे. याप्रसंगी बाजार समितीचे सहसचिव राम घाडगे, उपसचिव शिवाजी गायकवाड,बाळासाहेब गायकवाड, सहायक सचिव वामन तुपे, बाळासाहेब तळेकर, नीलिमा भोसले, भुसार बाजारचे प्रशांत गोते, स्थापत्य विभागप्रमुख प्रमोद तुपे, उपअभियंता अरविंद फडतरे आदी उपस्थित होते. पिंपरी उपबाजार, खडकी उपबाजार, भरारी पथक, पान बाजार, फुल बाजार, केळी बाजार, मांजरी उपबाजार, मांजरीचे फूल बाजार या ठिकाणी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत उत्पन्नात अडीच टक्क्यांपासून ते ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोट -

समितीकडे १५५ कोटी रुपयांच्या ठेवी असल्यामुळे समितीने कोणत्याही संस्थेकडून एकही रूपयाचेही कर्ज घेतलेले नाही. सेस वेळेवर भरण्यासाठी बारा टक्के व्याज, मेसेज सुविधा, चेक पॉईंट सिस्टीम, तसेच आवडते असोसिएशन चेंबर यांनी अडत्यांना भरण्यासाठी आव्हान केले. समितीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सेसमध्ये वाढ झाली आहे.

मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()