पुणे - ‘भारतीय उद्योगांतील नवकल्पना व अत्याधुनिक तंत्रज्ञान हे भारतीय लष्कराच्या क्षमतांमध्ये बदल घडवून आणत आहेत. या आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा येत्या काळात विविध मोहिमा, ऑपरेशन्समध्ये वापर करत राहू. ज्यामुळे भारतीय लष्कर भविष्यात स्वावलंबी ठरेल,’ असे मत दक्षिण मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी व्यक्त केले.