गाव पालिकेत, कचरा मात्र घरातच; सुप्रिया सुळेंनी केले ट्विट

गाव पालिकेत, कचरा मात्र घरातच; सुप्रिया सुळेंनी केले ट्विट
Updated on

किरकटवाडी : 30 जून रोजी किरकटवाडी गाव पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाले व विकासाची आस लावून बसलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र गाव पालिकेत समाविष्ट झाल्याच्या आनंदात असलेल्या किरकटवाडी रहिवाशांना कचरा गोळा करण्यासाठी मागील पाच ते सहा दिवसांपासून घंटागाडी न आल्याने व्हाट्स अ‍ॅप गृप, ट्विटर अशा समाज माध्यमांवर प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.

किरकटवाडी येथे ग्रामपंचायत प्रशासन असतानाही कचरागाडी वेळेवर येत नव्हती. चार-चार पाच-पाच दिवस घंटागाडी येत नसल्याच्या नागरिकांच्या तर तक्रारी होत्याच शिवाय ग्रामपंचायत सदस्यही कचऱ्याच्या समस्येबाबत अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करत होते. किरकटवाडी गावचा पालिकेत समावेश झाल्यानंतर ही कचऱ्याची समस्या अधिकच बिकट बनली आहे. त्याबत किरकटवाडीतील रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही 'किरकटवाडी डेव्हलपमेंट फोरम'चे ट्विट रिट्विट करत पुणे महानगरपालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.

गाव पालिकेत, कचरा मात्र घरातच; सुप्रिया सुळेंनी केले ट्विट
पुण्यात कामाच्या ठिकाणी ३० हजार जणांचे लसीकरण

"अगोदरच किरकटवाडी आणि परिसरात कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. प्रशासनाने तत्परतेने दखल घेऊन कचऱ्याचा विषय मार्गी लावावा. पर्याय नसल्याने लोक आजूबाजूच्या परिसरात कुठेही कचरा टाकतील. त्यामुळे समाविष्ट झालेली गावे अजूनच बकाल बनतील‌.तरी प्रशासनाने ही समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात."

- दत्ता रुपनवर, चेअरमन, उत्सव सोसायटी, किरकटवाडी.

"प्रशासनाने अचानकपणे सोसायटीतील कचरा उचलणे बंद केल्यामुळे आमच्या एकूण 106 फ्लॅट असणाऱ्या सुखस्वप्न सोसायटीत जमा झालेला कचरा कोठे टाकायचा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक दिवस कचरा उचलला नसल्यामुळे सोसायटीतील प्रत्येक सभासदाच्या फ्लॅटमध्ये दुर्गंधी पसरली आहे.प्रशासनाने तात्काळ कचरा गाडी चालू करावी हि नम्र विनंती."

- डॉ. भीमाशंकर उटगे, चेअरमन,सुखस्वप्न सोसायटी, किरकटवाडी.

"एखादा दिवस ठिक आहे पण पाच-सहा दिवस कचरा गाडी आली नाही तर कचरा ठेवणार तरी कोठे? यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने तात्काळ काहीतरी व्यवस्था करावी."

- मैथिली हातवळणे, कमल ग्रीनलीफ सोसायटी, किरकटवाडी

गाव पालिकेत, कचरा मात्र घरातच; सुप्रिया सुळेंनी केले ट्विट
पुणे शहरात दहा रुपयांत करा दिवसभर प्रवास

" खुप वेळा विणंती करावी लागायची तेव्हा कुठे चार पाच दिवसांतून एकदा कचरा गाडी सोसायटीत यायची. आताही पाच दिवस झाले कचरा नेला नाही. जसा कर आकारला जातो तशा सुविधाही मिळाव्यात ही आमची माफक अपेक्षा आहे."

- मनिष चार्य, मोरया स्पर्श सोसायटी, किरकटवाडी.

" सध्या ग्रामपंचायतीच्या घंटागाड्यांमध्ये डिझेल भरुन कचरा उचलण्याची व्यवस्था केली आहे. एकूण सदनिकांचा आम्ही सर्व्हे करत आहोत आणि त्याप्रमाणे आवश्यक कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोसायटीमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करणे आवश्यक असणार आहे. कचरा गोळा करण्यासाठी पुणे महापालिकेतील नोंदणीकृत खाजगी संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक सदनिका धारकाला दर महिना 60ते 80 रुपये लागणार आहेत."

- चंद्रकांत लाड, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.