मगर महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र विषयक आंतरराष्ट्रीय ई परीषद

जगभरातील ६०३ संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी
आण्णासाहेब मगर महाविद्यालय
आण्णासाहेब मगर महाविद्यालयsakal
Updated on

हडपसर : येथील आण्णासाहेब मगर महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र व पर्यावरणशास्त्रविषयक आंतरराष्ट्रीय ई परीषद झाली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापनदिन व महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व मायक्रोबायलाँजीस्ट सोसायटी आँफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र व पर्यावरण संबधित वैविध्यपूर्ण संशोधनाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जगभरातील ६०३ संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिषदेसाठी संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह मानदसचिव संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम. जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.

परिषदेचे बीजभाषण बांगगला देशाच्या राजशाही विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ. आनंदकुमार साहा यांनी केले व त्यांच्या शोधनिबंधाचे सादरीकरण केले. नेपाळच्या कांठमांडू विद्यापीठातील डॉ. रजनी शक्या व अमेरिकेतील कनास विद्यापीठातील डॉ. राजपक्षे बाबिलागे यांनी शोधनिबंध सादरीकरण केले.

आण्णासाहेब मगर महाविद्यालय
राज्यसभा पोटनिवडणूक: देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेससमोर अट ठेवली?

दुस­ऱ्या दिवशी उदयाना विद्यापीठ, इंडोनेशिया येथील डॉ. नीलू सुरियानी, त्रिभुवन विद्यापीठ नेपाळ येथील डॉ. रजनी माला व रियाद सौदी, अरेबिया येथील डॉ. मिर अली आदी तज्ज्ञांनी विविध विषयांवर सचित्र व्याख्यान दिले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सुमारे १९० संशोधक प्राध्यापक व विद्यार्थांनी परिषदेच्या संबधित विषयावर पॉवर पॉईंट सादरीकरण केले. प्रत्येक गटातील उत्कृष्ट सादरीकरणास बक्षिसे जाहीर करण्यात आली.

परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रसिध्द पर्यावरण विषयतज्ञ प्रो. डॉ. वेंकट गुणाले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना व उपस्थित सर्वांना पर्यावरणविषयक मार्गदर्शन केले. मायक्रोबायलॉजीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील संशोधनासंदर्भांत मार्गदर्शन केले.

आण्णासाहेब मगर महाविद्यालय
'ते' गृहमंत्री ED ला वेडे समजले, राज ठाकरेंचा अनिल देशमुखांना टोला

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, आय.क्यु.अे.सी. समन्वयक डॉ. रमाकांत जोशी, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. नेहा पाटील, प्रा. मंगेश देशपांडे, डॉ. उज्वला खिस्ती, डॉ. शुभांगी शिंदे, प्रा. मेघमाला वाघमोडे, प्रा. उर्मिला धनगर, धनंजय बागडे, संजय जेधे, रमेश बारगळ, सचिन शिंदे यांनी परिषदेचे संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.