International Tiger Day : वाघाविषयी सर्व काही! पुण्यात उद्यापासून ‘टायगर फेस्ट’

सहा माहितीपट पाहण्याची संधी
International Tiger Day
International Tiger Daysakal
Updated on

पुणे : जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने शुक्रवार (ता. २८), शनिवार (ता. २९) आणि रविवारी (ता. ३०) ‘टायगर फेस्ट’चे आयोजन केले आहे. वाघांवरील सहा माहितीपट पाहता येतील. तसेच देशातील व्याघ्र संवर्धनासाठी होत असलेले प्रयत्न आणि वाघांचे एकूण भविष्य निसर्गप्रेमींसमोर आणण्यात येणार आहे. त्यात राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ वाघांबाबत समग्र माहिती पुणेकरांसमोर मांडणार आहेत.

‘नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट’ संस्थेने २९ जुलै रोजी असलेल्या जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून ‘प्रोजेक्ट टायगर ची ५० सोनेरी वर्षे’ या कार्यक्रम मालिकेअंतर्गत ‘टायगर फेस्ट’ आयोजित केला आहे. प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांच्या ‘टायगर क्विन’ या वन्यजीव चित्रपटाचे २८ जुलै रोजी सादरीकरण होईल.

याप्रसंगी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, माजी प्रधान मुख्यवनसंरक्षक सुनील लिमये, आणि गोयल गंगा डेव्हलपमेंटचे संचालक अनुज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

International Tiger Day
Tiger 3 Video: क्या बात है.. टायगर ३ च्या सेटवर एकत्र दिसले शाहरुख - सलमान, फॅन्सकडून एकच जल्लोष

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २९ जुलै रोजी ऑप्टिमम टेलिव्हिजन निर्मित काउंटिंग टायगर्स’आणि ‘डिकोडींग मॅनइटर्स ऑफ सुंदरबन’ या दोन माहितीपटांचे सादरीकरण होईल. काउंटिंग टायगर्स या माहितीपटात २०१८ मधील व्याघ्रगणनेच्या वेळी ५० व्याघ्र प्रकल्पातून टीमने कसा प्रवास केला आणि या व्याघ्र गणनेचा निकाल काय आला याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

तर काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या सुंदरबनमधील वाघांचा एका शास्त्रज्ञांच्या टीमने केलेला अभ्यास ‘डिकोडिंग मॅनइटर्स ऑफ सुंदरबन्स’ या माहितीपटातून दाखवण्यात आला आहे. हा कार्यक्रम गोल्डन लीफ बँक्वेट हॉलतर्फे होणार आहे.

याप्रसंगी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीराम मोडक, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक आणि गोयल गंगा डेव्हलपमेंटचे संचालक अनुज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

३० जुलै रोजी सकाळच्या सत्रात नल्ला मुत्थू निर्मित ‘मछली-द वर्ल्ड फेमस टायगर’ या चित्रपटाचे व जंगलावर आधारित राजीव पंडित यांच्या ‘रानबोली’ पुस्तकाचेही प्रकाशन होईल. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील मछली या प्रसिद्ध वाघिणीची कथा नल्ला यांनी या चित्रपटातून दाखविली आहे.

International Tiger Day
International Tigers Day : जगाच्या तुलनेत 75% वाघ भारतामध्ये आहेत, हे कसं घडलं ?

तर, सायंकाळच्या सत्रात नल्ला मुत्थू यांच्या ‘टायगर्स रिव्हेंज’ आणि ‘क्लॅश ऑफ टायगर्स’ या वन्यजीव चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. मातृत्वाची प्रबळ इच्छा असणारी वाघीण त्यासाठी कोणते विस्मयकारक निर्णय घेऊ शकते याचे चित्रण टायगर्स रिव्हेंज या माहितीपटातून करण्यात आले आहे. तर ‘क्लॅश ऑफ टायगर्स’ ही रणथंबोरमधील एका व्याघ्र कुटुंबाची कहाणी आहे. या कार्यक्रमाला उद्योगपती अतुल किर्लोस्कर व एअर मार्शल भूषण गोखले उपस्थित राहणार आहेत

भारतातील व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांचा गौरवशाली मागोवा घेण्याची आणि ‘प्रोजेक्ट टायगर’ कार्यक्रमाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची संधी निसर्गप्रेमींना यानिमित्ताने मिळणार आहे. या कार्यक्रमाला गोयल गंगा डेव्हलपमेंट यांचे पाठबळ तसेच दैनिक ‘सकाळ’ आणि हेरिटेज डिझाईन्स यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी खुले असून जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘नेचरवॉक’तर्फे करण्यात आले आहे.

International Tiger Day
Disha Patani And Tiger Shroff: टायगरला पुन्हा 'दिशा' सापडली! व्हिडिओ व्हायरल...
  • २८ जुलै : सायंकाळी ६ वा. - ‘टायगर क्वीन एनएफडीसीचे नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडियाचे प्रेक्षागृह, लॉ कॉलेज रोड

  • २९ जुलै : सायंकाळी ६ वा. - काउंटिंग टायगर्स’ आणि ‘डिकोडिंग मॅनइटर्स ऑफ सुंदरबन’ - शुभारंभ लॉन्स (गोल्डन लीफ बँक्वेट हॉल), डीपी रोड

  • ३० जुलै : सकाळी १० वा. - ‘मछली -द वर्ल्ड फेमस टायगर’ माहितीपट व जंगलावर राजीव पंडित यांच्या ‘रानबोली’ पुस्तकाचे प्रकाशन - न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड

  • ३० जुलै : सायंकाळी ६ वा. - ‘टायगर्स रिव्हेंज’ व ‘क्लॅश ऑफ टायगर्स’ - एनएफडीसीचे नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडियाचे प्रेक्षागृह, लॉ कॉलेज रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.