देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या  2023 पर्यंत 90 कोटींवर 

 देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या  2023 पर्यंत 90 कोटींवर 
Updated on

"सिस्को संस्थे'चा अहवाल; मोबाईल वापरणाऱ्यांची संख्याही वाढणार 
पुणे - देशात 2023 पर्यंत इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल 90 कोटी 70 लाखांपर्यंत पोहचेल, असा अहवाल सिस्को वार्षिक इंटरनेट संस्थेने प्रसिद्ध केला आहे. ही संख्या त्या वेळी असलेल्या लोकसंख्येच्या 64 टक्के असेल. घरटी आणि दरडोई मोबाईल वापरणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढणार असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. 

दरवर्षी नव्या स्वरूपातील डिव्हाइस बाजारात दाखल होतात. स्मार्ट मीटर, व्हिडिओ सर्व्हेलन्स, हेल्थकेअर मॉनिटरिंग, वाहतूक अशा वाढत्या "एमटूएम' ऍप्लिकेशनची संख्या 2023 पर्यंत एकूण  डिव्हाईस व कनेक्‍शनच्या प्रमाणात 25 टक्के असेल. ग्रामीण भागांमध्ये डिजिटल साक्षरता, मोबाइलचे प्रमाण आणि इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीमध्ये वाढ होत आहे, यामुळे ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचे आव्हान "सर्व्हिस प्रोव्हायडर' कंपन्यांसमोर असेल. डिजिटलविश्वामध्ये योग्य गती आणि क्षमता राखण्यासाठी "क्‍लाउड' आणि "एज कॉम्प्युटिंग'चा वापर वाढणार असल्याचे "सिस्को'चे व्यवस्थापकीय संचालक आनंद भास्कर यांनी सांगितले. 

इंटरनेट वापरकर्ते 
वर्ष - संख्या - लोकसंख्येतील प्रमाणाची टक्केवारी 
2018 - 39 कोटी 80 लाख - 29 टक्के 
2023 - 90 कोटी 70 लाख - 64 टक्के 

मोबाईल वापरकर्ते 
2018 - 76 कोटी 30 लाख - 56 टक्के 
2023 (अंदाजे) - 96 कोटी 60 लाख - 68 टक्के 

नेटवर्क डिव्हाईसेस 
2018 - 1.5 अब्ज 
2023 - 2.1 अब्ज 

मोबाईल संलग्न डिव्हायसेस 
2018 - 1.1 अब्ज 
2023 - 1.4 अब्ज 

वायफाय संलग्न डिव्हायसेस 
2018 - 35 कोटी 98 लाख 
2023 - 69 कोटी 74 लाख 

नेटवर्कमध्ये स्मार्टफोनचे योगदान (एकूण मोबाईलच्या प्रमाणात) 
2018 - 61 कोटी 9 लाख - 42 टक्के 
2023 - 78 कोटी 10 लाख - 38 टक्के 

2023 पर्यंत देशातील मोबाईलबद्दलचा अंदाज 
- सर्व नेटवर्क्‍स डिव्हाइसपैकी 66 टक्के मोबाईल-कनेक्‍टेड असतील 
- 5 जी कनेक्‍शन 67.2 दशलक्ष (4.9 टक्के) असतील. म्हणजेच वीस कनेक्‍शनमध्ये एक 5 जी असेल 
- 4 जी कनेक्‍शन 53.1 टक्के असतील. 2018च्या तुलनेत त्यामध्ये दुप्पट वाढ होईल 

डाउनलोडिंग  मोबाईल ऍप्लिकेशन्स 
वर्ष - मोबाईल ऍप्लिकेशन्स 
2018 - 20.7 अब्ज 
2023 - 46.2 अब्ज 

सोशल नेटवर्किंग साइट 
2018 - 9.2 अब्ज 
2023 - 17.8 अब्ज 

खेळाचे ऍप्लिकेशन 
2018 - 6.4 अब्ज 
2023 - 10.5 अब्ज 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()