आयर्नमॅन दशरथ जाधवांचा सायकलिंगचा ब्रिटनमध्ये डंका

वयाच्या ६५ व्या वर्षी तरूणाला लाजवतील अस यश
Ironman Dashrath Jadhav
Ironman Dashrath JadhavSakal
Updated on

हडपसर : येथील उद्योजक दशरथ जाधव यांनी जगातील अत्यंत खडतर अशी "लंडन-एडिनबर्ग-लंडन सायकल स्पर्धा' निर्धारित वेळेत पूर्ण करून एक नवीन इतिहास रचला आहे. ब्रिटनमध्ये आयोजित केली जाणारी ही सर्वात अवघड सायकलिंग स्पर्धा आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी तरूणाला लाजवील असा उत्साह दाखवत उद्योजक जाधव यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत स्पर्धकांना १५२० किलोमीटर अंतराचे सायकलिंग केवळ १२८ तासात पूर्ण करायचे असते. यामध्ये सायकलिंग आणि विश्रांती अशी दोन्ही वेळ गृहीत धरली जाते.

या स्पर्धेत एकूण २० कंट्रोल पॉईंट्स होते. दोन कंट्रोल पॉईंट्समधील अंतर कोणत्याही सोयी किंवा मदती शिवाय तेही ठराविक वेळेतच पूर्ण करायचे असते. स्पर्धा चालू असताना नियमानुसार एखादी लहान चूक जरी झाली तरी स्पर्धकाला बाद ठरविले जाते. स्पर्धेत स्पर्धकाला शारीरिक तसेच मानसिक असे दोन्हीचाही समतोल साधत प्रवास करावा लागतो. जवळपास ४७ हजार ५६४ फूट चढ आणि ४७ हजार ५६३ फूट उतार असलेल्या डोंगराळ भागातून ऊन, वारा, पाऊस असताना देखील अतिशय किचकट परिस्थितीत स्पर्धा पूर्ण करणे गरजेचे असते.

भारतातील स्पर्धकांना ही स्पर्धा पूर्ण करताना वातावरणाचा सर्वात महत्वाचा अडसर असतो. युरोप खंड आणि आपल्यालाकडील वातावरणात मोठा फरक आहे. तेथील पाऊस, ऊन आणि वारा याचा अनुभव नसतो. याही परिस्थिती उद्योजक जाधव यांनी आपल्या वयावर मात करीत हे यश मिळविले आहे. त्यांच्यासोबत आशिष जोशी, किरीट कोकजे, अजित कुलकर्णी, डॉ. ओंकार थोपटे आणि फुरसुंगी येथील डॉ. चंद्रकांत हरपळे यांनीही ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण केली.

वयाच्या ६५ व्या वर्षी ही स्पर्धा पूर्ण करणारे जाधव हे भारतातील पहिलेच स्पर्धक आहेत. नुकतेच ते रेस ॲक्रॉस अमेरिका या स्पर्धेसाठी सुद्धा पात्र ठरले आहेत. आता पर्यंत त्यांनी सहा वेळा आयर्नमॅन हा किताब मिळविला आहे. दररोज पहाटे ३ ते ७ असे ४ तास ते सराव करीत असतात. त्यांच्या दिनक्रमात पोहणे, धावणे, सायकल चालवणे या गोष्टींचा सहभाग आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे त्यांच्या यशाचे गमक आहे. तरुणांनी व्यायाम करून आपले नियमित कामकाज करावे, या बाबत जाधव कायम आग्रही असतात. अनेक खेळाडूंना ते मदत करत असतात. सध्या हडपसर "फिटनेस हब' म्हणून उदयास येत आहे त्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()