Supriya Sule : अजित पवारांचं नेतृत्व मान्य आहे का? सुप्रिया सुळेंनी थेटच सांगितलं

शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेबाबत सुळेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
supriya sule ajit pawar
supriya sule ajit pawarEsakal
Updated on

पुणे : शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेबाबत सुळेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच अजित पवार यांचं नेतृत्व मान्य आहे का? या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. एबीपी माझ्याशी त्या बोलत होत्या. (Is Ajit Pawar leadership acceptable NCP Supriya Sule cleared her stand)

supriya sule ajit pawar
Gold Investment: अमेरिका आणि चीनची अर्थव्यवस्था मंदीत मात्र सोने खरेदीत तेजीत! असं का घडतंय?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असं विधान सुप्रिया सुळे यांनी नुकतंचं केलं होतं. त्यामुळं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. यापार्श्वभूमीवर बोलताना अजित पवारांचं नेतृत्व तुम्हाला मान्य आहे का? या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

supriya sule ajit pawar
Ajit Pawar: 'शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर...'; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

"अजित पवारांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रालाच मान्य आहे. सगळ्या पक्षांमध्ये अनेक चांगले नेते असतात. प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात. आम्ही अटलबिहारी वाजपेयींचं नेतृत्व मान्य केलं, एनडी पाटलांचंही मान्य केलं. त्यामुळं असंख्य नेते विविध पक्षांमध्ये असतात. त्यामुळं त्यांच्यातील नेतृत्व त्यांच्यातील चांगले गुण हे समाजाला मान्यचं असतात, असं त्यांनी सांगितलं आहे. (Marathi Tajya Batmya)

supriya sule ajit pawar
Honey Singh: भर स्टेजवरच हनी सिंगच्या अंगात आलं? जीभ बाहेर काढली अन्... व्हिडिओ व्हायरल

पक्षानं कारवाई का केली?

पहिल्या सभेत सर्वच जण विरोधात बोलले याचं आम्हाला खूपच दुःख झालं. कारण हे जे आरोप होते ते वास्तवतेपासून दूर होते. ज्या ताटात आपण एकत्र जेवलो त्यांच्यावर आरोप करणं त्यांचा अधिकार आहे पण काही आरोप हे न पटणारे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.