Artificial Baby : इस्राईलमधील संशोधकांची किमया; मूळपेशींतून तयार केले भ्रूण, शरीराबाहेर चौदा दिवस वाढला गर्भ

नैसर्गिक प्रक्रियेला छेद देत संशोधकांनी मूळपेशींचा प्रभावी वापर; भ्रूण तयार करण्यात यश
israel scientist research human species made human being in lab apart from human body
israel scientist research human species made human being in lab apart from human bodySakal
Updated on

पुणे/ नवी दिल्ली : सर्वसाधारणपणे पुरुषांमधील शूक्राणूंचा स्त्री बिजाशी झालेल्या संयोगातून गर्भाशयामध्ये भ्रूण तयार होते. आता या नैसर्गिक प्रक्रियेला छेद देत संशोधकांनी मूळपेशींचा प्रभावी वापर करून तंतोतंत मानवी भ्रूणासारखे दिसणारे भ्रूण तयार करण्यात यश मिळविले आहे.

इस्राईलमधील ‘वाइझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये हा प्रयोग झाला. संशोधकांना प्रयोगशाळेत १४ दिवसांपर्यंत मानवी गर्भाशयाच्या बाहेर गर्भ वाढविण्यात यश आले. या बाबतचे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

प्रयोगशाळेत तयार झालेले भ्रूण हे गर्भाशयात विकसित होणाऱ्या गर्भाप्रमाणेच दिसते. गर्भाशयात चौदाव्या दिवसांपर्यंत ज्या प्रकारे नाळ तयार झालेली असते, तशीच नाळ प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहे.

israel scientist research human species made human being in lab apart from human body
Pune News : लोखंडी सांगाडा कोसळून चार महिला जखमी; मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

प्रयोगशाळेतील गर्भातील पेशी, त्यांची रचना ही विकसित होणाऱ्या गर्भाप्रमाणेच असल्याचे विविध चाचण्यांमधून अधोरेखित झाले असल्याचेही या शोधनिबंधात नमूद करण्यात आले आहे. ‘वाइझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे प्रा. जेकब हॅना म्हणाले, “प्रयोगशाळेत तयार केलेल्या भ्रूणाचे प्रारूप हे मानवी भ्रूणाप्रमाणे ठरले आहे.

यासाठी शास्त्रज्ञांनी ‘प्लुरिपोटेंट’ मूळ पेशींच्या मदतीने हे भ्रूण तयार केले. या पेशींमध्ये मानवाच्या वेगवेगळ्या अवयवांमधील पेशींतील फरक ओळखून त्या नव्याने तयार करण्याची क्षमता असते.”

israel scientist research human species made human being in lab apart from human body
G20 Summit 2023: अंबानी-अदानींसह 500 उद्योगपती G20 मध्ये होणार सहभागी? PIB Fact Checkने सांगितले सत्य

भ्रूण कसे तयार झाले?

  • ‘प्लुरिपोटेंट’ या मूळपेशींचा वापर यासाठी करण्यात आला. या पेशींचे वैशिष्ट्य हे असते की, त्या शरीरातील कोणत्याही भागातील पेशी निर्माण करू शकतात. त्वचेतून मिळविलेल्या मूळपेशींना शास्त्रज्ञांनी त्यांच्या आधीच्या स्वरूपात आणले

  • नैसर्गिक गर्भधारणेत सातव्या दिवशी ज्याप्रमाणे हे भ्रूण दिसते तसेच याचेही रुप आहे

  • शास्त्रज्ञांनी तीन टप्प्यांत मूळपेशींचे विभाजन केले. त्या टप्प्यानुसार मूळपेशी सोडण्यात आल्या

  • यात प्रत्येक टप्प्यात काही रसायनांचा वापर करण्यात आला. त्यातून काही जनुक सक्रिय करणे शक्य झाले

  • तीन टप्प्यांतील पेशी पुढे जाऊन स्वतंत्रपणे विकसित होतात त्यातून भ्रूण तयार केले

israel scientist research human species made human being in lab apart from human body
G20 Summit: जी-20 परिषद म्हणजे नेमकं काय? कशामुळे महत्त्वाची आहे ही बैठक? जाणून घ्या

विकृतीचे कारण समजणार

गर्भधारणेच्या सुरवातीच्या दिवसांत वैद्यकीय गुंतागुंत होण्याचा धोका असतो. यावर अभ्यास करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. याबाबत पुण्यातील प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ आणि ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टेस्टिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष डॉ. संजय गुप्ते म्हणाले, “बाहेरून घेतलेल्या पेशींचे प्रत्यारोपण करणे हे अवयव प्रत्यारोपण करण्यासारखेच असते.

त्याला शरीराकडून विरोध होण्याचा धोका असतो. त्या ऐवजी त्याच व्यक्तीच्या पेशींचे रूपांतर मूळपेशींमध्ये करून त्यातून विविध अवयवांमध्ये त्या सोडतात येतात. पेशी नव्याने निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात असते.

यापुढे जाऊन आता मूळपेशींपासून भ्रूण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेकदा गर्भपात नेमका कशामुळे होतो? गर्भामध्ये आनुवंशिक विकृती का निर्माण होते? याच्या मुळापर्यंत पोचता येईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()