नोकरी सोडणाऱ्यांची अडवणूक

IT-Company
IT-Company
Updated on

पिंपरी - नोकरी सोडल्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार आणि अन्य रक्‍कम अडकवून ठेवल्याच्या २५ तक्रारी कामगार आयुक्‍तांकडे दाखल झाल्या आहेत. थकीत रकमेचा आकडा १५ लाखांपर्यंत आहे. दरम्यान, या सर्व केसेसची कामगार आयुक्‍त कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून त्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. 

आयटी पार्क आणि अन्य ठिकाणी कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडत असल्याची नोटीस कंपनी व्यवस्थापनाला दिली होती. व्यवस्थापनाने पगाराबरोबर कर्मचाऱ्यांना देय असणारी अन्य रक्‍कम दिली नाही. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाबरोबर बोलणीही केली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीच दाद न मिळाल्यामुळे कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे तक्रार नोंदवली. कामगार आयुक्‍तांनी संबंधित कंपनीचे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांची बाजू ऐकून घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी पावले उचलली आहेत. आतापर्यंत कामगार आयुक्‍तांकडे दाखल झालेल्या तक्रारींपैकी तीन ते चार जणांना त्यांची थकीत रक्‍कम मिळाली आहे. 

कोणतेही कारण न देता आयटी कंपन्यांनी कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या ५० तक्रारी कामगार न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी सुरू आहे.

नोकरी सोडल्यानंतर आयटी कर्मचाऱ्यांचा पगार आणि अन्य देय रक्‍कम थकवून ठेवली जाते. त्याबाबत विचारणा केल्यानंतरही व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. असे प्रकार उघड झाल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या मागे उभे राहण्याचे संघटनेने ठरवले आहे. थकीत रक्‍कम न मिळालेल्या अशा आयटी कर्मचाऱ्यांनी त्यांची तक्रार कामगार आयुक्‍तांकडे द्यावी.
- पवनजित माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज 

आयटी कर्मचाऱ्यांची थकीत रक्‍कम न दिल्याच्या तक्रारी कामगार आयुक्‍तांकडे आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून, कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. 
- निखिल वाळके, सहायक कामगार आयुक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.