Pune : जमीन व्यवहारात फसवणूक करत तुरुंगात पाठवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी जसप्रीतसिंगला अटक

कोंढवा भागातील जमिनीच्या व्यवहारातही एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Kondhwa Police Station
Kondhwa Police Stationesakal
Updated on
Summary

मुश्‍ताक शब्बीर मोमीन (वय ४५, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : जमीन व्यवहारात फसवणूक (Land Fraud) करत तुरुंगात पाठवून देण्याची धमकी दिल्या प्रकरणी जसप्रीतसिंग राजपाल (Jaspreet Singh Rajpal) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत (ता. ९) पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Kalyaninagar Accident Case) अल्पवयीन मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर देखील गुन्हा दाखल आहे.

कोंढवा भागातील जमिनीच्या व्यवहारातही एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणामध्ये अग्रवाल पिता-पुत्राविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Kondhwa Police Station
Paschim Railway : पश्चिम रेल्वेवर फुकटे वाढले! दोन महिन्यात तब्बल 38 कोटी 3 लाखांचा दंड वसूल

मुश्‍ताक शब्बीर मोमीन (वय ४५, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपाल यांना शनिवारी (ता. ८) न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने राजपाल यांना रविवारपर्यंत (ता. ९) पोलिस कोठडी सुनावली. राजपाल यांच्यावतीने ॲड हर्षवर्धन पवार यांनी बाजू मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.