काटेवाडी - जळगाव सुपे (ता. बारामती) येथे सध्या यादवकालीन जवळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व मंदिर डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली आहे. खोदकाम करताना मंदिर परिसरात वीरगळ व सतीशिळा आढळून आल्या आहेत. मंदिर परिसरात आढळलेल्या या सतीशिळा व वीरगळ यांचे जतन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.