‘ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर झूम वेबिनार

सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या साथीमध्ये ज्येष्ठांची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे ते लवकर बाधित होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मानसिक आधाराची गरज आहे.
We are in this Together
We are in this TogetherSakal
Updated on

पुणे - सकाळ माध्यम समूहातील (Sakal Media Group) ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या (Sakal Social Foundation) वतीने राबविण्यात येणाऱ्या we are in this together या उपक्रमाअंतर्गत व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) (Feskom) यांच्या सहकार्याने शनिवारी (ता. १५) दुपारी बारा वाजता कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवरल ‘जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्याची गुरुकिल्ली’ (Jeshtya nagrikansathi Aarogyachi Gurukilli) या विषयावर (Subject) पुण्यातील प्रसिद्ध अस्थिविकार तज्ज्ञ व हार्डीकर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. शरद हार्डीकर यांचे मार्गदर्शनपर मोफत झूम वेबिनार (Zoom Webinar) आयोजित करण्यात आले आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या संचालिका मृणाल पवार डॉ. हार्डीकर यांच्याशी संवाद साधतील. महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या वेबिनारमध्ये सहभागी होता येईल. (Jeshtya nagrikansathi Aarogyachi Gurukilli Subject Zoom Webinar)

सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या साथीमध्ये ज्येष्ठांची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे ते लवकर बाधित होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन प्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. या उद्देशाने वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे. ‘फेस्कॉम’द्वारे कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. या वेबिनारमध्ये वयानुसार ज्येष्ठ नागरिकांचा आहार कसा असावा, जेष्ठांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे का, या व इतर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

सहभागासाठी...

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक किंवा QR कोड ओपन करून रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या मेल आयडीवर झूम लींक पासवर्ड मिळेल.

www.waitt.in/register-now/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.