Pune Job Opportunity : पुण्यात वाढणार नोकरीच्या संधी; ‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट’मधील निरीक्षणे

यंदाच्या पहिल्या सहामाहीत गोदामे (वेअर हाउसिंग) आणि कार्यालयीन जागांच्या विक्रीत गाठलेला टप्पा बांधकाम व्यवसायासाठी मैलाचा दगड ठरला आहे.
पुण्यात वाढणार नोकरीच्या संधी
पुण्यात वाढणार नोकरीच्या संधीsakal
Updated on

पुणे : शहराने यंदाच्या पहिल्या सहामाहीत गोदामे (वेअर हाउसिंग) आणि कार्यालयीन जागांच्या विक्रीत गाठलेला टप्पा बांधकाम व्यवसायासाठी मैलाचा दगड ठरला आहे. यामुळे भविष्यात घरांच्या विक्रीसोबतच शहरात नोकऱ्यांच्या संधीदेखील वाढतील, अशी निरीक्षणे ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट- सप्टेंबर २०२४’ या अहवालात नोंदविण्यात आली आहेत.

‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या कॅम्प येथील कार्यालयात या अहवालाचे अनावरण करण्यात आले. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता, क्रेडाई पुणे मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, व्यवस्थापन समितीचे सदस्य पुनीत ओसवाल, डेटा विश्लेषक राहुल अजमेरा, हिरेन परमार आणि क्रेडाई पुणे मेट्रोचे १०० हून अधिक सदस्य या वेळी उपस्थित होते.

आजही परवडणारे शहर

अहवालाबद्दल अधिक माहिती देताना नाईकनवरे म्हणाले, ‘‘२०१९ च्या पहिल्या सहामाहीशी तुलना केल्यास यंदा घरांची विक्री ३६ टक्के वाढली आहे. गृहखरेदीदार हे मोठ्या घरांना पसंती देत आहेत. २०२४ च्या पहिल्या सहामाहीत विक्री झालेल्या युनिट्सचे सरासरी मूल्य ७१ लाख रुपये आहे.

२०२० च्या पहिल्या सहामाहीशी तुलना केल्यास हे प्रमाण ३९ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र ही टक्केवारी इतर शहरांच्या तुलनेने पुणे शहर आजही परवडणारे शहर असल्याचे दर्शविते, हे विशेष. आजही देशभरातील आणि राज्यातील नागरिक हे इतर मेट्रो शहरांपेक्षा नोकरी व राहण्यासाठी पुण्याला पसंती देत आहेत.”

वाढीचा वेग सर्वाधिक

पुणे हाउसिंग रिपोर्टसाठी लागणारी सर्व माहिती ही नोंदणी व मुद्रांक विभाग आणि रेराकडून उपलब्ध करून दिलेल्या माहितीमधून घेण्यात आली असल्याचे सांगत अभिषेक गुप्ता म्हणाले, ‘‘मुंबईनंतर पुणे शहर हे देशात सर्वाधिक वेगाने वाढणारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून समोर येत आहे. घरांच्या विक्रीमध्ये पुणे शहर आपले स्थान टिकवून ठेवत असताना वेअर हाउसिंग आणि कार्यालयीन जागांच्या विक्रीतही जागतिक पातळीवर महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येत आहे.

अहवालातील महत्त्वाची निरीक्षणे

  • पुणे पुन्हा एकदा घरांच्या विक्रीत देशातील प्रथम क्रमांकाचे शहर

  • २०२४ च्या पहिल्या सहामाहीत विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ही ७१ लाख रुपये

  • येथील बांधकाम व्यवसाय क्षेत्राने गेल्या ५ वर्षांमध्ये युनिट विक्रीच्या एकूण मूल्यामध्ये १६ टक्के वाढ

  • शहरातील घरांच्या सरासरी किमती इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी पहिल्या सहामाहीत शहरात

  • ३१ हजार कोटी मूल्य असलेल्या सुमारे ४४ हजार घरांची विक्री

  • गृहखरेदीदार हे मोठी घरे खरेदी करण्यास इच्छुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.