पुणे : पुणे शहरात कोरोना काळात कडक निर्बंध लागू करण्यासाठी पुणे पोलिसांनी कसलीही कसर पडू दिली नाही. या काळात पोलिस मित्र(SPO) कोरोना काळात पोलिसांच्या मदती करताना दिसत आहे. दरम्यान, बालगंधर्व चौकातील चेकपोस्टवरील एका पोलिस मित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. SPO राजा हा पोलिसांचा आर्दश सहाय्यक ठरत आहे. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी राजा, या श्चानाचे(कुत्र्याचे) फोटो पोस्ट करुन ट्विट आहे. विशेष म्हणजे या श्चानाला 3 पाय असून तो जगंली महाराज रस्त्यावर बालगंधर्व चेकपोस्टवर ऑन ड्युटी पोलिसांना मदत करतोय. (John Abraham retweeted Pune Police tweet of SPO Raja three-legged dog)
पुण्यात सध्या पोलिसांसोबत असलेल्या एका तीन पायांच्या श्चानाचा फोटो व्हायरल होत आहे. या ट्विटनंतर नेटकऱ्यांच्या खूप प्रतिक्रिया देखील येत आहेत. इतकेच नव्हे तर बॉलिवुड अभिनेता जॉन अब्राहम यानेही या फोटोची दखल घेत ट्विट केले आहे.
''आमचा खास पोलिसमित्र : बालगंधर्व येथील नाकाबंदीच्या ठिकाणी 3 पायांचा श्चान, राजा. एक जागरुक सहकारी आणि खरा मित्र आहे, जो संपुर्ण लॉकडाऊनच्या काळात आमच्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत आहे.'' असे ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विट नेटकऱ्यांनी रिट्विट करुन राजासाठी काळजी आणि चिंता व्यक्त केली आहे. राजाची चौकशी करणारे आणि काळजी व्यक्त करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी रिट्विट करुन आभार व्यक्त केले आहे.
''तुमच्याकडून राजाला मिळणारे इतकं प्रेम आणि वाटणारी चिंता ही नक्कीच हद्यस्पर्शी आहे. लोकांच्या भावना पाहाता, आमची संपुर्ण टीम चेकपोस्टवर जाऊन त्याची काळजी घेत आहेत, त्याला खाऊ-पिऊ घालत आहेत. तुम्ही आता घरी राहावे अशी आमची इच्छा आहे. तोपर्यंत आम्ही खात्री देतो की आम्ही राजाची व्यवस्थित काळजी घेऊ.''असे ट्विट करत पुणे पोलिसांनी नेटकऱ्यांना राजाची काळजी घेत आहोत असे सांगून आश्वस्त केले आहे.
दरम्यान, अभिनेता अभिनेता जॉन अब्राहम याने राजाचा फोटो ट्विट केला आहे. ''राजा, पुण्यातील तीन पायांचा श्चान -आपल्या सर्व शक्तीने शहराची सेवा करीत आहे!'' अशा शब्दात ट्विट करुन त्याने राजाचे कौतुक केले आहे.
बालगंधर्व चेकपोस्टवर काम करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, ''राजा आमच्यासोबत बऱ्याच काळापासून आहे आणि आता तो आमच्या टीमचा भाग झालेला आहे. फार पुर्वीच त्याने एक पाय गमावला होता. आम्ही सर्वजण त्याच्यासोबत आमचा डब्बा शेअर करतो आणि श्नानप्रेमी त्याला काहीना काही खाऊ-पिऊ घालत असतात. आमच्या ड्युटीच्यावेळी राजा सोबत असतो त्यामुळे आम्हालाही बरे वाटते.''
कोरोना रुग्णाची वाढती संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व कार्यक्षेत्रातील पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. दरम्यान, सद्यस्थितीत, लॉकडाऊन उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी एसपीओ म्हणून ओळखले जाणारे नागरिक-स्वयंसेवक मोठ्या संख्येने शहरभरातील पोलिसांना मदत करत आहेत. त्यामुळे शहरात एसपीओलाही विशेष महत्त्व आहे. पुण्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनच्या टीमला किमान २० एसपीओ मदत करतात.
दरम्यान, नियमित कामांव्यतिरिक्त कोरोनाशी संबंधित ड्युटीदेखील करत असल्याने पोलिस दलाला संसर्गाचा धोका जास्त आहे. एका महिन्यापासून पुणे पोलिसांनी कोरोना संबंधित काहीक्षण टीपून करण्यास ट्विट सुरवात केली आहे. दरम्यान काही दिवासांपूर्वी कोरोना काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांच्या कारणांची एक मजेशीर व्हिडिओ आणि ट्विट सीरज देखील पुणे पोलिसांनी सुरु केली होती. तसेच ‘Through the Barricade – A slice of life’ या थीममध्ये लॉकडाऊनमधील काही क्षणांचे फोटो आणि कॅप्शन सोबत शेअर केले होते तर ‘Good Morning Pune’ या थीम मध्ये पहाटे ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचाऱ्यांचे फोटो शेअर केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.