Atharva Sudame : युवा ‘कंटेट क्रिएटर’ अथर्व सुदामेचा सात लाख फॉलोअर्सचा अनोखा प्रवास

युट्यूब चॅनेलवर एक हजार फॉलोअर्सचा टप्पा पार करण्यासाठी सहा वर्षे लागली
Atharva Sudame
Atharva Sudamesakal
Updated on

पुणे : स्वतःची अनोखी शैली, आसपासच्या घटनांवर व परिस्थितीवर मार्मिकपणे भाष्य करण्याचे कौशल्य आणि तरुणाईसह सर्व वयोगटांतील लोकांचे मनोरंजन करण्याची हातोटी, असे वैशिष्ट्य असणारा युवा ‘कंटेट क्रिएटर’ म्हणजे अथर्व सुदामे. आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवलेल्या अथर्वने इन्स्टाग्रामवर सात लाख फॉलोअर्सचा टप्पा नुकताच पार केला.

या प्रवासाबद्दल अथर्व सांगतो, ‘‘मी २०१५-१६ पासून व्हिडिओ करत होतो. मात्र त्या वेळी इन्स्टाग्रामसारखे माध्यम उपलब्ध नव्हते. त्यामुळे ते कुठेही प्रसारित करत नसे. २०१९ पासून इन्स्टाग्राम आल्यावर त्यावर प्रसारित करायला सुरुवात केली. २०२१ मध्ये माझा एक व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिला आणि मग माझे फॉलोअर्स वाढायला लागले.’’

Atharva Sudame
Viral Reels : ऊसतोड पती-पत्नीच्या 'रिल्स'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

अथर्व म्हणाला, ‘‘माझ्या व्हिडिओला सुरुवातीला फारसा प्रतिसाद नव्हताच. पाच-सहा वर्षे १००-२०० असेच फॉलोअर्स होते. युट्यूब चॅनेलवर एक हजार फॉलोअर्सचा टप्पा पार करण्यासाठी सहा वर्षे लागली. या काळात संयम आणि सातत्य महत्त्वाचे ठरले. त्याचेच फळ मिळाले आणि गेल्या दोन वर्षांत झपाट्याने प्रतिसाद वाढला.’’

Atharva Sudame
'Instagram reels' बनवून तुम्हीही होऊ शकता मालामाल; कसे ते जाणून घ्या एका क्लिकवर

विचारपूर्वक मेहनत घ्या !

‘मी ज्या वेळी अशा प्रकारचे व्हिडिओ करायला सुरुवात केली, त्या वेळी असे काम करणारे लोक खूप कमी होते. त्यामुळे मी स्थिरावलो, तेव्हा मला हे पूर्णवेळ करिअर म्हणून पर्याय उपलब्ध झाला. पण आज अनेक लोक या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या प्रमाणात संधी कमी आहेत. अनेक व्यक्ती केवळ मोबाईल आहे, म्हणून व्हिडिओ करतात.

Atharva Sudame
Social Media : ‘बुरा ना टाईप करो...ना लाईक करो....ना शेअर करो’! अकोला पोलिसांकडून जनजागृती

पण त्या व्यतिरिक्त काही कौशल्य आहे का, हे तपासले पाहिजे. मी नाटकात काम केले आहे. त्याचे शिक्षणही घेतले आहे. गाणेही शिकलो होतो. त्यामुळे बोलायचे कसे, हावभाव कसे हवेत, याचे भान मला होते. या क्षेत्रात दीर्घकाळ काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी या गोष्टींवर विचारपूर्वक मेहनत घ्यावी, तरच यश मिळेल’, असा सल्लाही अथर्व याने दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.