जुन्नर : जुन्नर तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चौथ्या त्रैवार्षिक अधिवेशनात तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायात समितीच्या चार जागा लढविण्याची घोषणा करण्यात आली.
जुन्नर येथील कॉम्रेड प्रभाकर संझगिरी भवनात हे अधिवेशन पार पडले. यावेळी सुरवातीला पक्ष ध्वजास वंदन व शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले. पुणे जिल्हा माकपचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांनी अधिवेशनाचे उदघाटन केले. पुणे महानगर पालिका कामगार युनियनचे नेते प्रकाश जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी मागील चार वर्षांच्या विद्यार्थी, युवक,कामगार आणि शेतकरी आघाड्यांचा संघटनात्मक कार्याचा अहवाल सचिव विश्वनाथ निगळे यांनी यावेळी सादर केला.
या पुढील काळात खासगीकरण, बेरोजगारी, महागाई विरोधी लढा तीव्र करण्याचा, शेतकरी कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी संघर्ष उभारणे, आदिवासी, दलित महिलांच्या हक्कांसाठी लढा अधिक व्यापक करणे.तालुक्यातील पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करणे. शिक्षणातील सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध करणेआदी सहा ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
या अधिवेशनात पंधरा सदस्यांची नवीन तालुका समितीची निवड करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी माकप तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी गणपत घोडे यांची निवड करण्यात आली. तालुका निरीक्षक डॉ. महारुद्र डाके यांनी कामकाज आणि भविष्यातील आव्हाने यावर मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा सचिव एड. नाथा शिंगाडे यांनी नूतन समितीला शुभेच्छा दिल्या.
आगामी काळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करत त्यांच्या सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक,आरोग्य आणि रोजगार विषयक समस्यांना प्राधान्य देऊन काम केले जाईल असे नवनियुक्त सचिव गणपत घोडे यांनी सांगितले. विलास डावखर, डॉ. मंगेश मांडवे, सरपंच मुकुंद घोडे, लक्ष्मण जोशी, संजय साबळे, सोमनाथ निर्मळ आदी मान्यवर सदस्य यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.