'जुन्नर वनविभागात सध्या असलेली बिबट्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. प्रामुख्याने मंचर वनविभागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे.
मंचर - 'जुन्नर वनविभागात सध्या असलेली बिबट्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. प्रामुख्याने मंचर वनविभागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे.
भविष्यात मानव व बिबट संघर्ष तीव्र होणार आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी बिबट्यापासून बचाव व उपाय योजनाबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.' असे जुन्नर वनविभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.(Latest Marathi News)
अवसरी वन उद्यान्यात (ता.आंबेगाव) जुन्नर वनविभागाच्या वतीने आंबेगाव व खेड तालुक्यातील पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत सातपुते बोलत होते.
यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रवीण एन. आर, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे, खेड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ, वन विभागाचे कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.
सातपुते ते म्हणाले, 'सध्या दररोज बिबट्यांचे दर्शन होत असून हल्ल्याच्या घटना घडत आहेत. वनखात्यामार्फत ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करून दिलासा दिला जातो. जनजागृती केली जाते. (Marathi Tajya Batmya)
या भागातील पत्रकार सतत वनखाते व शेतकरी यांची बाजू समजून घेऊन व तारतम्य ठेऊन बातम्या करतात. वेळोवेळी वनखात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवतात.
सूचना करतात. त्यांनी केलेल्या सूचनांची दखल वनखात्याकडून प्राधान्याने घेतली जाते. बिबट व मानव संघर्ष कमी होण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.
डॉ. अखिलेश ढगे यांनी बिबट्याची जीवनशैली चित्रफितीद्वारे सादर केली. त्यामध्ये बिबट नर व मादीची वागणूक, बिबट्याचे पाऊल खुणा, बिबट्याचा हल्ला करण्याची पद्धत, मादीची प्रजनन क्षमता त्याचा कालावधी, बिबटे बछडे वयानुसार त्यांची वाढ, वजन, आहार याविषयी सविस्तर माहिती दिली. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे वनअधिकाऱ्यांनी दिली.
बिबट्याचे चित्र, शाल व श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. प्रवीण एन. आर, स्मिता राजहंस यांची मनोगते झाली. स्मिता राजहंस यांनी सूत्रसंचालन व प्रदीप रौंधळ यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.