Junnar: बिबट्याने केला दुचाकीवर हल्ला, दोन तरूण जखमी!

Latest Pune Update: बिबट्याचा त्याना उजव्या हाताच्या काखे मध्ये एक दात लागला व माडीवर दोन दात लागले असून गुडघ्यावर पंजा मारला.
Kaspathar: धक्कादायक! कासपठारवर बिबट्याने थेट दुचाकीस्वारावर केला हल्ला
leopard sakal
Updated on

Otur News: ओतूर ता.जुन्नर येथे बिबट्याने ओतूर पाथरटवाडी मार्गावर दोन दुचाकीवर हल्ला करून दोन तरूणाना जखमी केले असल्याची माहिती विघ्नहरचे संचालक धनंजय डुंबरे यांनी दिली.

सदर घटना गुरूवारी रात्री ८ वाजे दरम्यान घडली असून यात सुरेश राजेंद्र सावंत वय.२३ व सुरज राजेंद्र पानसरे वय.२८ दोघे ही राहणार पाथरटवाडी,ओतूर ता.जुन्नर असे बिबट हल्यात जखमी झालेल्या तरूणाची नावे आहेत.

Kaspathar: धक्कादायक! कासपठारवर बिबट्याने थेट दुचाकीस्वारावर केला हल्ला
Junnar News : ड्रोनच्या गस्ती वरील ग्रामस्थांना मिळाले गारगोटी दगड चोर

याबाबत मिळालेली माहिती अशी की सुरेश राजेंद्र सावंत हे दुचाकीवर ओतूर कपर्दिकेश्वर मार्गे पाथरटवाडी येथे घरी चालले होते त्याच वेळी रस्त्याच्या बाजूच्या शेतातून बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.ते दुचाकीवरून खाली पडले तरी बिबट्याचा त्याना उजव्या हाताच्या काखे मध्ये एक दात लागला व माडीवर दोन दात लागले असून गुडघ्यावर पंजा मारला.

सुरेश यांनी कसेबसे बिबट्याच्या तावडीतून सुटून पळ काढला.त्याच वेळी त्याच मार्गाने सुरज पानसरे दुचाकीवरून पाथरटवाडी येथे जात होते.त्यांच्या ही दुचाकीवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ही पायावर पंजा मारून जखमी केले.

Kaspathar: धक्कादायक! कासपठारवर बिबट्याने थेट दुचाकीस्वारावर केला हल्ला
Junnar News : ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर; मादीला जेरबंद करण्यात आले यश

दोन्ही जखमीना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सदर घटना कळताच ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी ही जखमींची भेट घेतली.डॉ.श्रीहरी सारोक्ते यांनी जखमीवर उपचार केले.

ओतूर व परीसरात बिबट्याची संख्या वाढली असून वनविभागाने ओतूर पाथरटवडी मार्गावर पिंजरा लावावा अशी मागणी विघ्नहरचे संचालक व ओतूरचे माजी सरपंच धनंजय डुंबरे यांनी केली आहे.

Kaspathar: धक्कादायक! कासपठारवर बिबट्याने थेट दुचाकीस्वारावर केला हल्ला
Junnar News : पाच गावांतील शंभर हेक्टर क्षेत्रातील अतिक्रमणे वनविभागाने काढली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.