Junnar News : ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर; मादीला जेरबंद करण्यात आले यश

Junnar News : ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर; मादीला जेरबंद करण्यात आले यश
Updated on

Junar News: हापुसबाग (ता.जुन्नर) येथे बुधवारी (ता.२४) वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व वनपाल नितीन विधाटे यांनी दिली.

जुन्नर जवळ असलेल्या हापुसबाग येथील रमेश भास्कर यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याची तक्रार होती.दोन दिवसांपासून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या.वनपाल विधाटे यांनी उसशेतात पाहणी केली.

Junnar News : ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर; मादीला जेरबंद करण्यात आले यश
Junnar News : शिवभक्तांना सर्व सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

असता तेथे एक मोठ्या व एक लहान बिबट्याचे पावलांचे ठसे आढळून आल्याने येथे तातडीने पिंजरा लावण्यात आला होता तसेच परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्या विषयी सूचना केल्या होत्या.पिंजऱ्यात सापडलेला बिबट दोन वर्षे वयाची मादी आहे.

बिबट्यास माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर बिबट्याने सावज म्हणून ठेवलेल्या दोन्ही कोंबड्याचा पंजाने पकडून फडशा पाडला. या परिसरात आणखी एक नर बिबटया असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने पाहणी करून येथे पुन्हा पिंजरा लावण्यात येईल असे विधाटे यांनी सांगितले.

आगर, हापुसबाग,अमरापूर,शिरोली परिसरात बिबट्या चा वावर असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. येथील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी जाताना हातात काठी,टॉर्च ठेवावी शक्यतो एकट्याने जाऊ नये.

Junnar News : ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर; मादीला जेरबंद करण्यात आले यश
Junnar Crime News : पिंपळवंडी येथे दिवसा चोरी...तीन दिवसात चौथी चोरी

मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत अशा सूचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.

आगर, हापुसबाग परिसरातील अनेक बिबटे गेल्या दोन वर्षात वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालेले आहेत.शिरोली खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यु झाला होता त्यामुळे वनविभाग सतर्क झाला आहे. मात्र बिबट्यांची वाढत चाललेली संख्या वनविभागाच्या चिंतेची बाब बनली आहे. या प्रश्नावर.लवकरात लवकर यावर उपाय करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Junnar News : ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर; मादीला जेरबंद करण्यात आले यश
Junnar News : पाच गावांतील शंभर हेक्टर क्षेत्रातील अतिक्रमणे वनविभागाने काढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.