Sakal India Foundation
Sakal India FoundationSakal

Junnar: सकाळ इंडिया फाउंडेशन व रोश इन्फॉर्मेशन सोल्युशन्स प्रा. लि यांचा संयुक्त उपक्रम पाच शाळांना ई लर्निंग संच भेट

ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याने याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, याच विद्यार्थ्यांमधून पुढे उद्याचे मोठे अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर व सायंटिस्ट घडतील असा विश्वास व्यक्त केला.
Published on

Sakal India Foundation , ओतूर - सकाळ माध्यम समूहातील सकाळ इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून व पुण्यातील डिजिटल हेल्थ केअर क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या रोश इन्फॉर्मेशन सोल्युशन इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या सहकार्याने जुन्नर तालुक्यातील पाच गरजू शाळांना नऊ ई-लर्निंग संच अभ्यासक्रमासह ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज शिक्षण संकुलात वाटप करण्यात आले.

Sakal India Foundation
Education : उच्च व तंत्र शिक्षण विभागाला येईना जाग! विद्यार्थ्यांचे ‘अभियंता’, ‘वकील’ होण्याचे स्वप्नं धुळीस

यावेळी सूर्यदत्त ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूटस् चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया,व्हाईस प्रेसिडेंट स्नेहल चोरडिया,ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, विस्तार अधिकारी मंगल डुंबरे,सुशीला डुंबरे,गाडगे महाराज शिक्षण संकुल ओतूरचे संचालक नितीन पाटील उपस्थित होते.

Sakal India Foundation
Mumbai Crime : पत्नीशी अनैतिक संबंधातून 17 वर्षीय मुलाची हत्या; मृतदेहाचे केले तुकडे, आरोपी अटकेत

यावेळी सकाळ इंडिया फाउंडेशन तर्फे ओतूर येथील संत गाडगेमहाराज माध्यमिक विद्यालयाला तीन ई - लर्निंग संच, तसेच ओतूर येथीलच श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळेला दोन संच. तर पिंपळगाव जोगा येथील संत गाडगे महाराज विद्या निकेतन माध्यमिक शाळेला दोन संच आणि धावशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला व उदापूर येथील कुलवडेमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रत्येकी एक संच असे एकूण नऊ ई - लर्निंग संच अभ्यासक्रमासह वाटप करण्यात आले.

तसेच यावेळी संबधीत शाळेच्या शिक्षकांना ई -लर्निंग संचाचा वापरून मुलांना अभ्यासक्रमाचे अध्यापन करण्याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले.

याप्रसंगी सचिन कांडगे यांनी सकाळ सोशल फाउंडेशन व सकाळ इंडिया फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून, ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याने याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, याच विद्यार्थ्यांमधून पुढे उद्याचे मोठे अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर व सायंटिस्ट घडतील असा विश्वास व्यक्त केला.

Sakal India Foundation
Mumbai Crime : पत्नीशी अनैतिक संबंधातून 17 वर्षीय मुलाची हत्या; मृतदेहाचे केले तुकडे, आरोपी अटकेत

तसेच यावेळी डॉ.संजय चोरडिया यांनी श्री संत गाडगे महाराज शिक्षण संकुलातील व आश्रम शाळेतील व्यवस्था पाहून येथील विद्यार्थ्यांना सकाळ सोशल फाउंडेशन च्या शिफारशीतून प्रथम येणार्‍या विद्यार्थांसाठी राकेश शर्मा व कल्पना चावला शिष्यवृत्ती अशा दोन प्रत्येकी ११ हजार रुपयांच्या शिष्यवृत्ती स्व:खर्चाने सुरू करत असल्याचे यावेळी जाहीर केले.

यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थी,संबधीत शाळांचे शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र अहिनवे यांनी केले तर आभार शोभा तांबे यांनी मानले.गाडगे बाबांच्या पसायदानने कार्यक्रमांची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.