आळेफाटा : जुन्नर व संगमनेर तालुक्यातील काही गावांमध्ये आज काही ठिकाणी भूकंपाच्या सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचे निर्माण झाली आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा, घारगाव, माळवाडी, आंबीदुमाला, केळेवाडी या गावांमध्ये तसेच संगमनेर तालुक्याच्या शेजारीच असलेल्या जुन्नर तालुक्यातील आळे, आळेफाटा, वडगाव आनंद, तसेच पिंपळवंडी या गावांना आज सायंकाळी चार वाजून छत्तीस मिनीटांनी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान याबाबत नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी हा भूकंप 4.6 रिश्टर स्केलचा असल्याची माहीती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनीू सांगितले आहे. तसेच यापूर्वीही संगमनेर तालुक्यातील या गावांमध्ये भुकंपाचे धक्के जाणवत असताना जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या आळेफाटा परिसरातील आळे, वडगाव आनंद, या गावांना भुकंपाचे धक्के जाणवले होते .
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.