Pune News : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरण परिसरात फ्लेमिंगो पक्षांचे आगमन

गेल्या कित्येकवर्षा पासून पावसाळ्यात रोहित पक्षी या पिंपळगाव जोगा धरण परीसरात येत असल्याच्या नोंदी आहेत .
Flamingo bird
Flamingo birdsakal
Updated on

जुन्नर- जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरण परिसरात फ्लेमिंगो ज्यांना रोहित तथा अग्निपंख पक्षी म्हणून ही ओळखतात या पक्षाचे आगमन झाले आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी ही एक चांगली संधी असल्याची माहिती पक्षी निरीक्षक उत्तम सदाकाळ व नंदकुमार साबळे यांनी दिली.

गेल्या कित्येक वर्षा पासून पावसाळ्यात रोहित पक्षी या पिंपळगाव जोगा धरण परीसरात येत असल्याच्या नोंदी आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील करंजाळे,खुबी, कोल्हेवाडी, खिरेश्वर,सांगणोरे या परिसरात धरणाच्या किनाऱ्याला पाणथळ जागी व दलदल परीसरात हे पक्षी दिसून येतात.

Flamingo bird
Pune : निविदेतील हस्तक्षेपामुळे पुण्याची बदनामी

हे पक्षी समुहाने रहातात. धरण परिसरात असणाऱ्या पाणथळ जागेत शेवाळ, शंख शिंपले, विविध कृमी, कीटक खाण्यासाठी हे पक्षी या परिसरात स्थलांतरीत होवून येत असतात. तसेच विणीच्या हंगामासाठी फ्लेमिंगो पक्षी येथे दाखल होत असतात.

Flamingo bird
Flamingo birdsakal

लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. मोठ्या संख्येने पक्षी दाखल झाल्यावर त्यांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद ठरतात व भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो.

Flamingo bird
Pune : अनेक दिवसांपासुन राजुरी परिसरात धुमाकुळ घालणारा बिबट्या; पिंज-यात जेरबंद

या पक्ष्यांचे थवेच्या थवे धरणाच्या कडेला व पाण्यात दिसतात. हे पहताना शिस्तबद्ध पध्दतीने जणू काही त्यांच्या कवायती चालल्याचा भास होतो. पिंपळगाव जोगा धरण परिसरात सध्या फ्लेमिंगो पक्षांसोबत विविध पक्षी दिसून येतात.

त्यात प्रामुख्याने नदीसुरय,चमचा,पांढरा शराटी, चित्रबलाक,राखी बगळा, करकोचे,शेकाट्या, उघड्या चोचीचा मुग्धबलाक, जांभळा बगळा,चिखल्या, कुरल, पाणकावळा, कुदळ्या, पाणकोंबडी, तूतवार, कृष्णबलाक यांचाही समावेश आहे.

Flamingo bird
Flamingo birdsakal
Flamingo bird
Pune : विहिरीमध्ये पडलेल्या चार मजुरापैकी एका मजुराचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला; पण...

पक्षी निरीक्षक उत्तम सदाकाळ म्हणाले, पावसाळ्याच्या सुरुवातीला परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून तसेच भारतातील काही भागातून स्थलांतरित होऊन फ्लेमिंगो पक्षी आपल्याकडे पिंपळगाव जोगा धरण परीसरात येत असतात.

फ्लेमिंगो पक्षांना समुद्री राघू किंवा रोहित पक्षी असेही म्हणतात. आकाशात झेपावताना गुलाबी रंगाने माखलेले हे पक्षी खूप सुंदर दिसतात. बाणाच्या टोकाप्रमाणे इंग्रजी “व्ही’ आकार करून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात साद घालत उडणारे गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो बघणे एक अलौकिक सुख असते. पक्षी निरीक्षणासाठी पक्षी अभ्यासकांनी या भागात फिरताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.