पुणे : ‘‘न्यायव्यवस्थेचा आदर कायम ठेवायचा असेल तर तिचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. तसेच चांगले आणि गतीने न्यायदान व्हायला हवे. वकील आणि न्यायव्यवस्था संवेदनशील असले तरच घटनेचे पालन होईल. न्यायव्यवस्था टिकवून ठेवण्यात वकिलांची देखील मोठी भूमिका आहे. ही जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे, अन्यथा लोकशाही टिकणार नाही,’’ असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.