Maharastra Kesari 2023: शिवराज राक्षे ठरला 'महाराष्ट्र केसरी' अन् काका पवारांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले...

महाराष्ट्र केसरीची फायनल खेळणारे दोन्ही फायनलिस्ट हे एकाच तालमीतले आहेत.
Kaka Pawar_Govid Pawar
Kaka Pawar_Govid Pawar
Updated on

पुणे : अवघ्या तीस सेकंदात पैलवान महेंद्र गायकवाडला चितपट करत पुण्यातील खेड तालुक्यातील पैलवान शिवराज राक्षे यानं 'महाराष्ट्र केसरी'चा बहुमान मिळवला. यानंतर त्याचे प्रशिक्षक काका पवार आणि गोविंद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेची शनिवारी फायनल पार पडली.

Kaka Pawar_Govid Pawar
Maharashtra Kesari: शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी; महेंद्र गायकवाडला चीतपट करत पटकावले जेतेपद

वस्ताद काका पवार म्हणाले, "आम्ही खूप मेहनत केलेली होती, यावेळी देखील आम्हाला आशा होती की फायनलला दोन्ही खेळाडू आमचेच येणार. यातील एक स्पर्धा फक्त सिकंदरसोबत मातीतली होती. पण आता दोन्ही जिंकल्यानंतर दोन्ही पैलवान आमच्याच तालमीतले आहेत, त्यामुळं मी खूपच आनंदी आहे"

Kaka Pawar_Govid Pawar
Maharashtra Kesari 2023 : कुस्तीच्या फडातून फडणवीसांचा राजकीय शड्डू; कुस्तीपटूंवरही केला आश्वासनांचा वर्षाव

तर दुसरीकडं वस्ताद गोविंद पवार म्हणाले, "मला शंभर टक्के आत्मविश्वास होता की फायनलमधील दोन्ही पैलवान माझ्या तालमीतलेच असतील. यासाठी मी एक वर्षापासून मेहनत घेत होतो आणि माऊलीच्या आशीवार्दानं हे दोन्ही पैलवान फायनलला आले त्याचा मोठा आनंद आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.