Kalu Waterfall Accident: काळू धबधब्यात हैद्राबादचा पर्यटक गेला वाहुन, शोध कार्य सुरू

पाऊस,दाट धुके,पाण्याचा प्रवाह यामुळे शोध कार्यात अडथळे येत आहे.
kalu waterfall
kalu waterfallsakal
Updated on

खिरेश्वर - येथून मुरबाड तालुक्यात वाहत जाणाऱ्या काळू नदीच्या धबधब्यात मुरबाड बाजूने खाली हैद्राबाद चा पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे.सदर पर्यटक हे मुरबाड तालुक्यातील थीतबी गावा कडून काळू धबधबा जेथे पडतो

तेथे सोमवारी हैद्राबाद वरून वर्षा विहारासाठी गेले होते त्यातील एक तरूण पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेला असून त्याचा बुधवारी सकाळ पर्यंत त्याचा शोध लागला नसून पाऊस,दाट धुके,पाण्याचा प्रवाह यामुळे शोध कार्यात अडथळे येत आहे.

kalu waterfall
Pune News : भाटघर धरणात बाप-लेकीचा मृत्यू; ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरु

अभिषेक रावळकर वय.२९ रा.उंटी, हैद्राबाद असे वाहून गेलेल्या पर्यटकाचे नाव असून हैद्राबाद येथील चार पर्यटक काळू नदीत जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर परीसरातून काळू धबधबा जेथे पडतो त्या जागी मुरबाड तालुक्याकडून जावून वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते तेव्हा ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर व हरिचंद्रगड परिसरातून काळू नदीचा उगम होऊन ती वाहत मुरबाड तालुक्यात जाते.मात्र जुन्नर तालुक्यातून खाली मुरबाड तालुक्यात नदीचे पाणी पडताना मनमोहक असे तयार झाले आहे व ते पाहण्यासाठी नेहमी पर्यटक येत असतात.त्यात हे काळू नदीवरील काळू धबधबा पाच टप्यात खाली पडतात.

kalu waterfall
Pune Crime:धक्कादायक ! पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा, दोघांना अटक

ते पर्यटकांबरोबरच ट्रेकर्सचा ही आकर्षण असल्याने आणि सोशल मिडिया येथील धबधब्याचे फोटो विडिओ मोठ्या प्रमाणात प्रसिध्द असल्याने देश भरातून तरूण येथे येता.काळू धबधब्याच्या या टप्प्याकडे मुरबाड तालुक्यातील थीतबी या गावातून जावे लागते.

त्यात पुढे काळू नदी ही पार करावी लागते.काही पर्यटक येथे स्थानिकांनी लावलेल्या सशुल्क रोपवेचा वापर करतात तर काही पुढे जाऊन काळू नदी स्वताच पार करताना. ह्या हैद्राबादचे पर्यटकांनी स्वता पुढे जाऊन पाण्यातून नदी पार करण्याचा प्रयत्न केला या पर्यटकांपैकी दोन जण पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाय घसरून ते वाहू जाऊ लागले त्यातील एकाला स्थानिक नागरीकांना वाचवण्यात यश आले.

kalu waterfall
Pune EV : पुणे होणार 'पेट्रोल'मुक्त? इलेक्ट्रिक गाड्यांना पुणेकरांची वाढती पसंती; वर्षात 30 हजारांहून अधिक ईव्हींची नोंद

मात्र एक तरूण नदीच्या पाण्यात वाहुन गेला.पुढे येथे काळू नदीचा खोल डोह आहे. सदर तरूण वाहून त्या डोहात गेला आहे.सदर घटना समजल्यावर जुन्नर रेस्कुटीमचे शांताराम बाम्हणे व इतर सदस्य व ठाणे रेस्कुटीम दिपक वीशे व इतर सदस्य यांनी मंगळवारी सायंकाळ पर्यंत तो पर्यटक जेथून वाहून गेला तेथून शोध मोहिम सुरू केली मात्र सायंकाळ आंधार पडू लागल्याने शोधमोहीम थांबली होती.बुधवारी परत शोध मोहीम रेस्कुटीम व प्रशासना कडून सुरू करण्यात आली असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.