Kalyani Nagar Accident : आपण दोघे भाऊ, मिळून खाऊ! ; पब, हॉटेलमध्ये आजी-माजी अधिकारीच भागीदार

कल्याणीनगरमधील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे शहरात अनेक पब, हुक्का पार्लर, मद्यविक्री करणाऱ्या हॉटेलमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस खात्यातील आजी-माजी अधिकारीच भागीदार असल्याची चर्चा आहे.
Kalyani Nagar Accident
Kalyani Nagar Accidentsakal
Updated on

पुणे : कल्याणीनगरमधील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे शहरात अनेक पब, हुक्का पार्लर, मद्यविक्री करणाऱ्या हॉटेलमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस खात्यातील आजी-माजी अधिकारीच भागीदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असतानाही कारवाई न होण्यामागे हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे.

कल्याणीनगरमधील प्रकरणात वेळेचे आणि वयाचे उल्लंघन करून शहरात मद्यविक्री होत असल्याचे समोर आले आहे. सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असतानाही उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस खात्याकडून पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नाही. याबाबत अधिक माहिती घेतली असता या दोन्ही खात्यातील आजी-माजी अधिकारी अनेक ठिकाणी भागीदार असल्याचे कळाले. त्यामुळे कारवाई करताना हात आखडता घेतला जात आहे.

भूगाव परिसरात बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत एकदाही कारवाई केलेली नाही. गस्तीवर असताना पोलिसांची गाडी नियमित तेथून जाते; मात्र ते कोणताही हस्तक्षेप करत नाही. मध्यंतरी बेकायदा बांधकाम असल्यामुळे ‘पीएमआरडीए’ने तेथील हॉटेलवर कारवाई केली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच हॉटेल सुरू झाले. हॉटेल पहाटे सहापर्यंत सुरू असतात. पोलिस व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांमुळे तेथे कोणीही कारवाईचा धमक दाखवत नाही.

कल्याणीनगर, विमाननगर, कोरेगाव पार्क, मुंढव्यातील काही हॉटेलमध्ये उत्पादन शुल्क अधिकारी व पोलिस भागीदार आहेत. त्यामुळे तक्रार देऊनही कोणी कारवाई करत नाही. हॉटेल पहाटेपर्यंत चालू असतात. त्यात बहुतांश बेकायदेशीर असून मद्य परवाना नसतानाही दारूविक्री होते.

- माजी पोलिस अधिकारी

Kalyani Nagar Accident
Kalyani Nagar Accident : पुण्यातील वातावरण गरम; पोलिस प्रशासन मात्र थंड

डान्सबार राजरोसपणे सुरू

राज्यात डान्सबारवर बंदी आहे; परंतु पौडमधील एका लॉजमध्ये राजरोसपणे डान्सबार सुरू असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. यापैकी बहुतांश ठिकाणी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आजी-माजी अधिकारीच भागीदार आहेत. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी दरमहिना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठी रक्कम मोजावी लागते, असेही एका हॉटेल व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘सकाळ’ला सांगितले.

नियमांचे उल्लंघन

कोरेगाव पार्क, विमाननगर, कल्याणीनगर, मुंढवा, बावधन, पौड, भूगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पब, हुक्का पार्लर, मद्यविक्रीचे हॉटेल आहेत. त्यापैकी काही विनापरवाना राजरोसपणे सुरू आहेत. परवानाधारक आणि विनापरवाना अशा दोन्ही ठिकाणी वेळेच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. स्थानिक रहिवाशांनी तक्रारी करूनही पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते, त्यामागे हे कारण असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.