Kalyani nagar Accident : शिपाई घटकांबळेनेच घेतले तीन लाख; सीसीटीव्ही चित्रीकरण हाती

ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे यानेच येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या आवारात तीन लाख रुपये घेतल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे.
Kalyani nagar Accident
Kalyani nagar Accident sakal
Updated on

पुणे : ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे यानेच येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या आवारात तीन लाख रुपये घेतल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्या सांगण्यावरून त्याने पैसे स्वीकारले आहेत, त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण ही पोलिसांच्या हाती लागले आहे.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री भरधाव पोर्श कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण व सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाचा वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यास पोलिसांनी अटक केली. दरम्यान, मुलाला वाचविण्यासाठी विशाल, त्याची पत्नी शिवानी यांनी ससूनच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क साधला.

डॉ. तावरेने डॉ. हाळनोर याला अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करण्यास सांगितले. मुलाच्या रक्तात मद्यांश मिळू नये, यासाठी शिवानीने रक्त नमुन्यासाठी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. या सर्व कामासाठी ससूनमधील डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना पैसे दिल्याचे तपासात उघड झाले होते.

संबंधित मुलाला १९ मे रोजी येरवड्यातील बाल न्याय मंडळाच्या आवारात हजर करण्यात आले होते. बाल न्याय मंडळाच्या आवारातच घटकांबळेने अश्फाक मकानदार याच्याकडून तीन लाख रुपये घेतले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण जप्त केले आहे.

पोलिसांनी घटकांबळेकडून ५० हजार रुपये जप्त केले आहेत. डॉ. हाळनोरकडून अडीच लाख रुपये जप्त केले होते. डॉ. तावरे याच्या सांगण्यावरून आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.