Kalyani Nagar Accident : ससूनचा कारभार होणार का पारदर्शी?

कल्याणीनगरच्या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या ससून रुग्णालयाच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी पावले उचलली आहेत. प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि शिस्तबद्धता याला सर्वाधिक महत्त्व दिले असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.
Kalyani Nagar Accident
Kalyani Nagar Accidentsakal
Updated on

पुणे : कल्याणीनगरच्या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या ससून रुग्णालयाच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी पावले उचलली आहेत. प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि शिस्तबद्धता याला सर्वाधिक महत्त्व दिले असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. मात्र याची अंमलबजावणी किती प्रभावशाली होते, यावर सर्व अवलंबून आहे.

न्यायवैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाची सुरुवात आपत्कालीन विभागापासून होते. त्यामुळे तेथील कारभार पारदर्शक करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या समन्वयाने बदल करण्यात येत असून, स्वतंत्र अहवाल तयार करून त्याबाबतचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. न्यायवैद्यकीय विभागात आलेल्या रुग्णाच्या कागदपत्रांवर नोंदी कशा कराव्या, रक्तनमुने संकलन कसे करावे, त्याच्या तपशिल कसा ठेवावा, अशा सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात आला आहे.

१‘सीसीटीव्ही’संख्या वाढविणार

रुग्णालयातील आपत्कालीन विभागाची रचनेत बदल करण्याचाही एक विचार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा सल्ला घेण्यात येईल. या विभागातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. कॅमेरे नसलेल्या ठिकाणी कल्याणीनगर अपघातात रक्त नमुने घेण्यात आले होते. त्यामुळे पारदर्शकतेसाठी ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे.

२ त्रुटी सुधारण्यावर भर

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्तनमुन्यात अदला-बदल झाल्याचा आरोप आहे. त्याच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वतंत्र समिती स्थापन केली होती. अहवालात आपत्कालीन विभागातील त्रुटींवर भर देण्यात आला आहे. त्यानंतर ससून रुग्णालय प्रशासनाने सुधारणा करण्यासाठी पावले उचलली असल्याचे चित्र आता दिसत आहे.

सुधारणा कुठे पाहिजे?

  • रुग्णांच्या नोंदी व्यवस्थित ठेवणे

  • न्यायवैद्यकीय रुग्णांमधील नोंदीचे महत्त्व सांगणे

  • आपत्कालीन विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे

  • न्यायवैद्यकीय प्रकरणांमध्ये वेगवेगळे नमुने घेण्याची माहिती देणे

  • कर्मचाऱ्यांनी पारदर्शी कारभारावर भर द्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.