दोन दिवसांमध्ये पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एक तरुण आणि तरुणीला अल्पवयीन मुलाच्या चुकीमुळे आपला जीव गमवावाल लागला. भरधाव अलिशान कारने धडक दिल्याने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून न भेटल्यामुळे या अपघातातील पीडितांनी आपल्या मित्रांसोबत डिनर पार्टी आयोजीत केली होती. पण, पण पाडित आणि त्यांच्या मित्रांची ही भेट शेवटची होती हे कोणालाच माहीती नव्हते.
"आम्ही त्या सायंकाळी भेटलो आणि एका हॉटेलमध्ये जेवायला गेला. ते जवळच होते. पण जेव्हा आम्ही माघारी परतत होतो तेव्हा हा अपघात झाला अन् काही क्षणातच सर्वकाही संपवले," असे या पीडितांचा मित्र आकिब मुल्ला याने सांगितल्याचे, वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
अपघातात मृत पावलेल्या अनिशबद्दल बोलताना त्याचा मित्र आकिब म्हणाला, "तो माझ्यासाठी 'सरजी' होता. आम्ही इंजीनिअरींगला असताना वर्गमित्र होतो. आम्ही दोघेही एकाच वयाचे, पण त्याच्याकडे माझ्यापेक्षा खूप प्रघल्भता होती."
अनिश हा मध्य प्रदेशातील उमराई जिल्ह्यातील होता. त्याने डी. वाय पाटील कॉलेजमधून इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. गेल्या दोन महिन्यांपासून तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंटर्नशीप करत होता. तर, अपघातात मृत्यूमुखी पडलेली अश्विनी कोस्टा अनिश काम करत असलेल्या कंपनीत नोकरीला होती. तिने काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.
"अनिश खूप हुशार होता. त्याने कॉलेजमध्ये सर्वात्तम कामगिरी केली होती. त्याला पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेला जायचे होते. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा तो कोडिंगविषयी बोलायचा," असे त्याच्या मित्राने, इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
"अनिश आपल्या धाकट्या भावासोबत विमाननगर परिसरात राहत होता. अनिश खूप लाजाळू होता. इथे तो जास्त लोकांना ओळखतही नव्हता. आम्हीच त्याचे पुण्यातील मित्र होतो," असे आकिब म्हणाला.
अनिशच्या वैय्यक्तिक आवडींविषयी बोलताना आकिब म्हणाला, "तो फूडी होता. जिथे जाईल तिथे दाल-तडका खाणे त्याच्यासाठी विधी होता. पण, तो आज आमच्यामधून गेला आहे यावर विश्वास बसत नाही."
दरम्यान, पुण्यात घडलेल्या या अपघातामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हा अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामिन मिळाल्यानंतर या संतापात आणखी भर पडली आहे. नागरिकांच्या दबावामुळे आता या अल्पवयीन मुलाच्या फरार झालेल्या वडिलांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.