Pune Porsche Accident : पब-बारचालकांवर अंकुश ठेवण्याची गरज

नियम धाब्यावर बसविणाऱ्या पबचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणांना यापुढेही कटाक्षाने लक्ष द्यावे लागणार आहे.
Pune Porsche Accident place
Pune Porsche Accident placesakal
Updated on

पुणे - कल्याणीनगरमधील अपघातानंतर खडबडून जाग आलेल्या पोलिस आणि सरकारी यंत्रणांनी नियम न पाळणाऱ्या पब, बार, हॉटेलच्या विरोधात कारवाई सुरू केली खरी, पण आणखी फार तर दोन आठवडे अशीच परिस्थिती राहील, मग सारे काही पूर्वीसारखेच चालेल, असा सूर ‘सकाळ’च्या पाहणी दरम्यान ऐकायला मिळाला. त्यामुळे इतका निगरगट्टपणा येतो कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नियम धाब्यावर बसविणाऱ्या पबचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणांना यापुढेही कटाक्षाने लक्ष द्यावे लागणार आहे. शहरात आठवड्यापूर्वी देशाला धक्का देणारी घटना घडल्याचे गांभीर्य पबमध्ये जाणाऱ्या वर्गाला वाटत नव्हते. दोन निष्पाप व्यक्तींच्या मृत्यूविषयी इतकी असंवेदनशीलता दिसून आली.

कल्याणीनगरमधील घटनेला आठवडा उलटताना नेम की काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’च्या १९ जणांच्या नऊ पथकांनी शनिवारी रात्री दहा ते रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत शहरातील पब, बारमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले. या व्यवसायात प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा आत्मविश्वास यांच्यात आला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब, बारचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. पब, बारच्या परिसरात नाकाबंदी करून ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत: शुक्रवारी आणि शनिवारी ही कारवाई मोठ्या प्रमाणावर करणार आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

‘सकाळ’ची पाहणी, अनेक प्रश्‍न अनुत्तरित

  • नियमांची अंमलबजावणी नाइलाजाने सुरू आहे का, असा प्रश्न

  • पंचवीस वर्षे वयाच्या आतील मुलांना मद्य न देण्याबाबत तपासणी कायम राहणार का याबाबत संशय

  • पोलिसांचे रस्त्यावरील अस्तित्व अद्याप कमीच

  • नियमांबद्दल कुणालाच काही स्पष्टता आहे असे वाटत नाही

  • रात्रीची पूर्ण स्वतंत्र चकचकीत अर्थव्यवस्था निर्माण झाल्‍याने त्याची पाळेमुळेच सापडत नाहीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.