Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल बाल न्याय मंडळास सादर

Pune Porsche Accident Latest News : पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत एका अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती.
Pune Porsche Accident
Pune Porsche Accident Esakal
Updated on

पुणे, ता. १८ : कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळास (जेजेबी) सादर केला आहे. या अहवालाच्या माध्यमातून अपघाताबाबतची संपूर्ण माहिती मंडळास देण्यात आली आहे. गुन्हा घडल्यापासून त्याच्या तपासातील अनेक टप्प्यांची माहिती पोलिसांनी या अहवालाच्या माध्यमातून मंडळास दिली आहे.

पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत एका अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. कल्याणीनगर येथे १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला होता. दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेत जेजेबीमध्ये हजर केले होते. अपघातानंतर काही तासांत किरकोळ अटींवर मुलाला जामीन देण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण सोशल मीडियावर ट्रोल झाले होते.

त्यामुळे जेजेबीने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अर्ज करून अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजावे, असा अर्ज पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केला. सत्र न्यायालयाने पुणे पोलिसांना पुन्हा बाल न्याय मंडळात अर्ज करण्याला सांगितले. त्यानुसार पुणे पोलिसांनी मंडळात अर्ज केला असता अल्पवयीन मुलाला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोनदा मुलाच्या बालसुधारगृहातील मुक्कामात वाढ करण्यात आली आहे. अपघाताची सविस्तर माहिती या अहवालाच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली.

Pune Porsche Accident
Most Expensive Cities: मुंबई भारतातील सर्वात महागडे शहर; पुणे कोणत्या नंबरवर? पहा संपूर्ण यादी

अहवालात काय नमूद आहे?

- अपघाताचा सखोल तपास

- अपघात कसा घडला याची संपूर्ण माहिती

- हॉटेल आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण

- मोटारीत अल्पवयीन मुलासोबत असणारा चालक, मोटारीतील मुले, पार्टीत सामील झालेले मुले, प्रत्यक्षदर्शींचे जबाब

Pune Porsche Accident
Skin Bank for Jawan: लष्करातील जवान अन् कुटुंबियांसाठी आता 'स्कीन बँक’; अत्याधुनिक उपचार शक्य

मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम २५ जूनपर्यंत वाढला

अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम २५ जूनपर्यंत वाढला आहे. मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचा अर्ज पुणे पोलिसांनी दाखल केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा अक्षी जैन यांनी मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम वाढविण्याचा आदेश दिला होता. मुलाला १२ जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला आहे. ही मुदत संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज पोलिसांनी केला होता. दरम्यान सुरुवातील मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश मंडळाने दिला होता. नंतर त्यात सात दिवसांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम १२ जूनपर्यंत वाढला होता. आता पुन्हा या मुदतीत २५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Pune Porsche Accident
पंढरपूर- कराड रोडवर सात महिलांना ट्रकने चिरडले! रस्त्यावर एसटी बसची वाट पाहात थांबलेल्या 7 पैकी 5 महिलांचा जागीच मृत्यू

मुलाच्या मुक्कामाला का मिळाली मुदतवाढ?

अद्याप मुलाचे समुपदेशन सुरू आहे. तसेच व्यसनाधिनतेबाबत देखील त्याला समुपदेशन करण्यात येत आहे. सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीविताला धोका आहे, अशी माहिती मंडळातील सरकारी वकील आणि पोलिसांनी मंडळाला दिली दिली. त्यानुसार मुदतवाढ करण्यात आली आहे. मुलाचे मानसिकदृष्ट्या आणि व्यसनाधिनतेच्या बाबतीत अद्याप समुपदेशन सुरू आहे. मुलाची बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. अपघाताच्या दिवशीचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यातून मुलाची ओळख सार्वजनिक झाली आहे. त्यामुळे मुलाच्या जिवाला धोका आहे, असे विशेष सहायक सरकारी वकील मोनाली काळे यांनी जेजेबीच्या निदर्शनात आणून दिले.

अहवाल सादर करण्यासाठी पोलिसांनी मागितली होती मुदतवाढ

मुलाला प्रौढ ठरवत त्यावर खटला चालवायचा असेल तर या गुन्ह्यात पोलिसांना मुलाला बाल न्याय मंडळात हजर केल्यापासून ३० दिवसांत पोलिस तपासाचा अहवाल (दोषारोपपत्र) दाखल करणे बंधनकारक असते. बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायद्यात त्याबाबत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिस तयारी करत असल्याचे त्यांनी मंडळात दाखल केलेल्या अर्जात नमूद आहे. मात्र पोलिसांनी आता अहवाल सादर करण्यासाठी १४ दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र पोलिसांनी आहे त्याच मुदतीत अहवाल सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.