पुणे - कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘पोर्श’ कारमध्ये मागे बसलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर आरोपी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात शरण आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ५) या आरोपीचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो हजर झाला आहे.