पुणे - कल्याणीनगरमधील अपघातानंतर अल्पवयीन मुलासोबत मोटारीत मद्याच्या अमलाखाली असलेल्या त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणखी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. अल्पवयीन कारचालकाच्या दोन्ही मित्रांनी मद्यप्राशन केले असतानाही त्यांच्या बचावासाठी तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी अटक आरोपींनी विशाल अग्रवालसह ससूनमधील डॉक्टरांशी संगनमताने कट रचून रक्ताचे नमुने बदलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.