Kalyaninagar Pune Accident : वैद्यकीय तपासणीला विलंब; पोलिसांची संदिग्ध भूमिका,यंत्रणेबाबत समाजमाध्यमातून प्रचंड संताप

मोटारचालक मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यास पोलिसांना तब्बल नऊ तास लागले. अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करताना ३०४ (अ) कलम लावले.
Kalyaninagar Pune Accident
Kalyaninagar Pune Accidentsakal
Updated on

मोटारचालक मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यास पोलिसांना तब्बल नऊ तास लागले. अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करताना ३०४ (अ) कलम लावले. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर कलम ३०४ लावण्यात आले. गंभीर गुन्ह्यात आरोपीला तातडीने जामीन कसा मिळाला? श्रीमंत आणि गरिबांना वेगळा न्याय आहे का? असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. पोलिसांची संदिग्ध भूमिका, सरकारी यंत्रणांकडून सर्वसामान्यांना मिळणारा न्याय याबाबत समाजमाध्यमातून प्रचंड संताप व्यक्त केला.

सुरुवातीला जुजबी कलम का?

अपघातानंतर येरवडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०४ (अ) लावले. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यात बदल करून पोलिसांनी कलम ३०४ लावले. राजकीय दबावातून पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न विचारला जात आहे. न्यायालयात अर्ज करण्यापूर्वी कलम ३०४ लावल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सारवासारव केली.

अपघाताच्या वेळी चालक गाडीत होता का?

ज्यावेळी कल्याणीनगरमध्ये अपघात झाला, त्यावेळी गाडीत चालक होता का? याबाबत पोलिसांना अद्याप संभ्रम आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर मिळालेले नाही. तसेच अपघाताच्या वेळी आरोपीचे आणखी दोन मित्र गाडीत होते. पोलिसांनी त्यांच्यावर काय कारवाई केली? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

पबची तपासणीच नाही...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उशिरापर्यंत चालणाऱ्या पबची शेवटची तपासणी कधी केली? अल्पवयीन मुलांना पब, बारमध्ये मद्य दिले जात होते, हे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीत कधी दिसले नाही का? किती पबचालकांवर ठोस कारवाई केली. कारवाई केली तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यापूर्वी किती पब, बार सील करण्यात आले, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

मद्यपार्टीत उडविले ४८ हजार

अल्पवयीन आरोपीने रविवारी मध्यरात्री मित्रांसमवेत मद्यपार्टी केली. त्यात त्यांनी मद्य व जेवणावर ४८ हजार रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पार्टी करण्यासाठी तो मित्रांसमवेत पबमध्ये गेला होता. त्याने मित्रांसह कोझी आणि ब्लॅक पबमध्ये मद्य सेवन केले. तेथे त्यांनी जेवण केले. पोलिसांनी या दोन्ही हॉटेलमधील तपासलेल्या चित्रीकरणात ते मद्य सेवन करीत असल्याचे आढळून आले आहे. ऑनलाइन बिल अदा केल्याच्या नोंदी तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.