Pune Porsche Accident: आरोपीचेच नव्हे तर 2 मित्रांचेही रक्त नमुने बदलले, CMOच्या रेस्टरुममध्ये पोलिसांसमोरच सुरु होतं सगळं?

Pune Porsche Accident Latest Update: हाळनोर याने आणखी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेला बोलावून घेऊन तिघांचे रक्त नमुने घ्यायचे असून, साहित्य घेऊन येण्यास सांगितले.
Pune Porsche Accident
Pune Porsche Accident
Updated on

पुणेः कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याचे आता पुढे आले आहे. एवढेच नाही तर त्यासाठी अल्कहोल नसलेल्या कापसाचा वापर करण्यात आला असून, थेट सीएमओ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) अधिकार्‍याच्या रेस्ट रुममध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आले आहेत. दोषारोपपत्रात हे नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकतेच पुणे पोलिसांनी याबाबत 900 पानांचे दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले आहे. कल्याणीनगर येथे मध्यरात्री अपघात झाल्यानंतर 19 मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता येरवडा पोलिस कार चालक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या सोबत अपघातग्रस्त कारमध्ये असलेले दोन मित्र अशा तिघांना घेऊन त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केले आहे काय ? हे पाहण्यासाठी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आले होते.

त्यावेळी प्रथमोपचार विभागाचा प्रमुख डॉ. श्रीहरी हाळनोर हा कर्तव्यावर होता. त्याच्यासमोरच या तिघा मुलांना हजर करण्यात आले होते. हाळनोर याने तिघा मुलांना काय त्रास होतोय का, असे विचारून वैद्यकीय केसपेपर तयार केले.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: पोर्शे अपघात प्रकरणात तब्बल 900 पानांचे आरोपपत्र दाखल, पण मुख्य आरोपीचे नाव का नाही?

दरम्यान, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा प्रमुख असेला डॉ. अजय तावरे याने अगोदरच डॉ. हाळनोर याला सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार हाळनोर याने सीएमओ रुमच्या बाजूला डॉक्टरांसाठी असलेल्या रेस्टरुममध्ये कारचालक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने घेतले.

यानंतर आणखी तिघा व्यक्तींच्या रक्ताचे नमुने त्याच खोलीत घेण्यात आले. त्यामध्ये अल्पवयीन कार चालक मुलासाठी एका महिलेचे, तर त्याच्या दोन मित्रांसाठी इतर दोन व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. यानंतर मुलाचे आणि त्याच्या मित्रांचे रक्त नमुने डॉ. हाळनोर याने कचर्‍याच्या पेटीत टाकून दिले. त्याऐवजी महिला आणि इतर दोन व्यक्तीचे रक्त नमुने सिलबंद करण्यासाठी पाठवून दिले.

रक्ताचे नमुने घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांना बोलावले

डॉ. हाळनोर याने रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णलयात त्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांना बोलावले होते. महिला डॉक्टर तेथे रक्त नमुना घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य घेऊन गेल्यानंतर, डॉ. हाळनोर त्यांना सीएमओसाठी असलेल्या रेस्ट रुममध्ये घेऊन गेला. त्यावेळी तेथे एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिला अशा दोघांचे रक्त नमुने घेण्यात आले.

त्याचवेळी हाळनोर याने आणखी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेला बोलावून घेऊन तिघांचे रक्त नमुने घ्यायचे असून, साहित्य घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार महिला डॉक्टर साहित्य घेऊन आल्या आणि सीएमओ खोलीत बसल्या. मात्र त्यावेळी हाळनोर याने परत महिला डॉक्टरांना अल्कहोल असलेल्या कापसाऐवजी सुका कापूस घेऊन येण्यास सांगितले. या महिला डॉक्टरांनी तिघांच्या रक्ताचे नमुने घेऊन हाळनोर याच्या ताब्यात दिले.

Pune Porsche Accident
Pune Porsche Crash: 'त्या' अल्पवयीन आरोपीने लिहिला 300 शब्दांचा निबंध; ट्रॅफिक नियोजनाचं कामही करणार...

रक्तनमुने घेताना पोलीस हजर ? राजरोस सर्वांसमोर सुरू होते काम

डॉ. हाळनोर याने सीएमओ केबीनच्या बाजूला डॉक्टरांसाठी असलेल्या रेस्ट रुममध्ये सर्वांच्या रक्ताचे नमुने घेतले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेथे अल्पवयीन मुलासोबतच इतर व्यक्ती देखील उपस्थित होत्या.अल्पवयीन मुलगा आणि त्याचे दोन मित्र अशा तिघांसाठी एक महिला आणि इतर दोघे असे तिघांचे रक्त नमुने घेण्यात आले.महिला डॉक्टर सुका कापूस घेऊन सीएमओ केबीनमध्ये आल्या. त्यावेळी एक महिला, एक मुलगा, एक पोलिस आणि एक व्यक्ती दरवाजाजवळ थांबलेला होता.

हाळनोर याने तेथेच महिला आणि मुलाला रक्तगटाबाबत विचारणा केली. त्यामुळे पोलिस समोर असताना देखील रक्त बदलण्यासाठी आलेली मंडळी राजरोस सीएमओच्या केबीनमध्ये फिरत होती. एवढेच नाही तर सीएमओ डॉक्टरच्या रेस्टरुमध्ये शिरुन रक्त देऊन बाहेर येत होती. त्यामुळे कारचालक अल्पवयीन मुलाच्या आई-वडील इतर नातेवाईक, मित्र सहकारी यांनी डॉ. तावरे मार्फत नियोजन लावून डॉ. हाळनोर याच्याकडून रक्त नमुने बदलून घेण्याचे काम केल्याचे दिसून येते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.