मुक्कामाचे ठिकाण असलेले कारगिल झालंय पर्यटनस्थळ : फिरोज खान

काही वर्षांपूर्वी कारगिल हे श्रीनगर ते लेह प्रवास करणाऱ्यांसाठी केवळ मुक्कामाचे ठिकाण होते. मात्र आता कारगिल देखील पर्यटन स्थळ झाले आहे.
Kargil
KargilSakal
Updated on

पुणे : काही वर्षांपूर्वी कारगिल हे श्रीनगर ते लेह प्रवास करणाऱ्यांसाठी केवळ मुक्कामाचे ठिकाण होते. मात्र आता कारगिल देखील पर्यटन स्थळ झाले आहे. पर्यटनासाठी येथे असलेल्या सुविधा आणि सुरक्षित वातावरण यामुळे येथील पर्यटन वाढतच आहे, अशी माहिती ‘लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल’चे अध्यक्ष फिरोज खान यांनी गुरुवारी दिली.

कारगिल महोत्सवानिमित्त पुणे दौऱ्यावर असलेल्या कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी व कारगिलमधील शासकीय आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’च्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी खान यांनी ही माहिती दिली. ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार आणि संपादक सम्राट फडणीस यांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

Kargil
‘बघा-आबा’ सौदीतून कोल्हापुरात

खान यांच्यासह कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष सुखदावे, कारगिल महापालिका कमिटीचे उपाध्यक्ष गुलजार हुसेन, नायब तहसीलदार मोहद हसन, ऑल कारगिल ट्रॅव्हल्स ॲण्ड ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष महम्मद अली, ‘रुट्स लडाख संस्थेचे संस्थापक मुझांमिल हुसेन, कारगिल आॅलेंम्पिंक असोसिएशनचे सहसचिव सेद मेहराजुद्दीन शहा, मुख्य नियोजन अधिकारी अबुल हाडी, कौन्सिलचे विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) अन्वर हुसेन, ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, शैलेंद्र पगारिया, संजीव शहा यावेळी उपस्थित होते.

खान म्हणाले, ‘‘महाराष्ट्र आणि गुजरातमधून कारगिलमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पुणे व कारगिलचे संबंध आणखी वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहे. कारगिलमधील शिक्षण व खेळाला वाढविण्यावर भर आहे. शिक्षण क्षेत्रात आता चांगले पर्याय उपलब्ध होत आहेत. मात्र खेळासाठी आवश्‍यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यासाठीचे पुण्याकडून मदत घेतली जाणार आहे. येथील विकास कामांसाठी आता स्वतंत्र बजेट असून फंड देखील मिळत आहे.

मात्र आमची राजकीय शक्ती आता कमी झाली आहे. प्रशासकीय नोकऱ्यांची भरती २०१९ नंतर पूर्णतः: थांबली होती. पण नवीन धोरण आल्याने भरती पुन्हा सुरू झाली असून त्यात लडाखसाठी जागा राखीव राहत आहेत. दोन विद्यापीठ सध्या कारगिलमध्ये सुरू होत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत.’’ कारगिलमधील सुरक्षा, राजकीय स्थिती, वातावरण, विकास कामे, दळणवळण, शिक्षण आणि मॅरेथॉन आदी बाबींची खान यांनी यावेळी माहिती दिली.

Kargil
MPSC विरोधात लिहाल तर...;आयोगाचा विद्यार्थांना इशारा

स्थानिक व्यवसाय वाढविण्यावर भर :

कारगिलची ५२ टक्के अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र आता केवळ पर्यटनावर अवलंबून राहता स्थानिक व्यवसाय वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक घरी व जास्त जमीन असलेल्यांना ग्रीन हाऊस तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होर्इल. तसेच वर्षभर ताज्या भाज्या मिळू शकतील, असा विश्‍वास खान यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.