Kargil Vijay Diwas : आम्हाला सामर्थ्यावर विश्वास होता! दौंडच्या सूर्यकांत जठार यांनी जागविल्या कारगिल युद्धाच्या आठवणी

शत्रू तोफगोळे आणि रॅाकेटचा मारा करीत असताना ‘जिंकू किंवा मरू’ अशी स्थिती होती. परंतु आम्हाला आमच्या सामर्थ्यावर विश्वास होता आणि भारतीय लष्कराने या युद्धात विजय मिळविला.’
Suryakant Jathar
Suryakant Jatharsakal
Updated on

दौंड - ‘कारगिल युद्धात द्रास सेक्टर या प्रतिकूल भूमीवर खराब हवामानात बर्फाच्छादित शिखरांच्या तीव्र उतारावर आम्ही प्राणपणाने लढत होतो. पाकिस्तानने आपल्या ज्या चौक्या ताब्यात घेतल्या आहेत त्या परत मिळवून विजय मिळविणे हा एकच ध्यास होता.

शत्रू तोफगोळे आणि रॅाकेटचा मारा करीत असताना ‘जिंकू किंवा मरू’ अशी स्थिती होती. परंतु आम्हाला आमच्या सामर्थ्यावर विश्वास होता आणि भारतीय लष्कराने या युद्धात विजय मिळविला.’ अशा आठवणी व्यक्त केल्या दौंड येथील कारगिल योद्धा सूर्यकांत मारुती जठार यांनी.

‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध जिंकण्यात आले. त्या निमित्ताने कारगिल योद्धा सूर्यकांत जठार यांच्याशी संवाद साधला. जठार म्हणाले, ‘कारगिलमध्ये आपल्या काही चौक्या (पोस्ट) पाकिस्तानने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्याने आमची तुकडी जी कुपवाडा येथून बेळगाव येथे जाणार होती तिला थेट द्रास येथे रवाना करण्यात आले.

त्यावेळी मी द्रास सेक्टर येथे १८ गढवाल रायफल्सच्या एका तुकडीत नेमणुकीस होतो. या प्रदेशाचे तापमान उणे ३० ते ४० अंश सेल्सिअस होते. शिवाय ज्यांच्याबरोबर युद्ध करायचे ते शिखरांवर आणि आम्ही खाली असल्याने भरपूर अडचणी होत्या.’

‘वातावरणाशी समरस होण्यासाठी आम्ही तीन दिवस त्या परिसरात गस्त घालीत होतो. त्या दरम्यान देखील शत्रूकडून आमच्यावर रॅाकेटचा मारा आणि अवतीभोवती बॅाम्बगोळे पडून स्फोट होत होते. लष्कराने मजल दरमजल करीत रात्री आगेकूच करीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नियोजनपूर्वक आपल्या चौक्या परत घेतल्या.

प्रत्यक्ष युद्धाच्यावेळी लष्करी शिस्त आणि सरावाचा फायदा शत्रूशी दोन हात करताना झाला. पाकिस्तानी घुसखोरांनी ताब्यात घेतलेल्या चौक्या आपण परत मिळवून ही मोहीम यशस्वी झाली.’ असेही जठार यांनी सांगितले.

राष्ट्रीय छात्र सेना ते लष्कर

कारगिल योद्धा सूर्यकांत मारुती जठार यांचे प्राथमिक शिक्षण दौंड शहरातील जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शिक्षण शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण दौंड महाविद्यालयात झाले. शालेय जीवनात ते राष्ट्रीय छात्र सेनेत होते.

१९९४ मध्ये लष्करात भरती झाले आणि प्रशिक्षणानंतर ते १८ गढवाल रायफल्समध्ये रुजू झाले. लष्करी सेवेत संयुक्त राष्ट्राच्या इथिओपिया आणि इरिट्रियामधील मिशनमध्ये सहभागी झाले होते. मराठा लाइट इन्फंट्री मधून २०१३ मध्ये ते हवालदार या पदावरून निवृत्त झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()